या तारखेला महाराष्ट्रात धो धो पाऊस! ; मॉन्सूनबाबत ‘ही’ आहे मोठी अपडेट.

मुंबई : राज्यात पेरण्या रखडल्या आहेत. 20 जून येऊनही राज्यात मॉन्सूनच्या पाऊस दाखल झाला नाही. केरळमध्ये फक्त दोन दिवस उशीरा पाऊस दाखल झाला. मात्र, राज्यात अजून मॉन्सूनच्या पावसाचा पत्ता नाही. शेतकरी पावसाची वाट पाहात आहेत. 20 जून आला असूनही पाऊस नसल्याने राज्यात पेरण्या रखडल्या आहेत. उष्णता कमालीची वाढत आहे. भारतीय हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा मोठा इशारा दिला. मॉन्सून राज्यात दाखल होण्याकरिता अजून काही दिवस वाट पाहावी लागेल. मॉन्सूनबाबत मोठी अपडेट पुढे आली. राज्यासाठी ही अत्यंत मोठी धोक्याची घंटा आहे. मॉन्सून सध्या अरबी समुद्रात सक्रिय आहे. गेल्या काही दिवसांपासून मॉन्सून तिथेच आहे. मॉन्सूनची पुढे अजिबात वाटचाल नाही. हेच नाही तर सर्वात धोक्याची गोष्ट म्हणून मॉन्सून पुढे दोन ते तीन दिवस तिथेच थांबण्याची शक्यता आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा जाण्याची शक्यता आहे. आता थेट जुलै महिन्यात पाऊस मॉन्सूनचा राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात मॉन्सूनला पुढे सरकण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. अजिबात मॉन्सूनची प्रगती दिसत नाही. ही स्थिती पुढील काही दिवस आहे, तशीच राहण्याची शक्यता आहे. ज्यामुळे राज्यात लगेचच मॉन्सूनचा पाऊस दाखल होणार नाही. 1 जुलैनंतर राज्यात धो धो पावसाला सुरूवात होण्याचा अंदाज आहे.

पुढील किमान 8 दिवस मॉन्सूनच्या पावसाकरिता वाट पाहवी लागणार आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कमालीची उष्णता वाढली. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवस उष्णता कायम राहिल. पेरण्या रखडल्या आहेत. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. मात्र, पाऊस अजून काही दिवस येणार नाही. जुलै महिन्यात पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात मॉन्सून एकाच जागी रेंगाळला आहे. पुढे काहीच वाटचाल नाही. ज्यामुळे राज्यात मॉन्सून दाखल होण्याकरिता अजून काही दिवसाचा कालावधी लागणार आहे. आज राज्यात उष्णता वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाडा, कोकणात उष्णता वाढेल. विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. मॉन्सूनने आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, ओडिसा, झारखंड आणि बिहार या राज्यांमध्ये प्रगती केली. मात्र, अरबी समुद्रात मॉन्सूनची स्थिती तशीच आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles