शक्तीशाली भूकंपाने जमीन थरथरली! ; आतापर्यंत १३२ जणांचा मृत्यू तर १५०० हून अधिक संसार उद्ध्वस्त!

बोगोटा : कोलंबियामध्ये 7.4 तीव्रतेच्या भूकंपाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. भूकंपात आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. तर 87 जण जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे 1575 घरांचे नुकसान झाले आहे. तर अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तर 61 इमारतींचंही मोठं नुकसान झालं आहे. भूकंपानंतर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भूकंपाच्या धक्क्यानंतर बचाव पथकांकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. कोलंबियात शक्तीशाली भूकंप झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरू आहे. पश्चिम कोलंबियातील काली, क्विब्डो, परेराच्या आसपासच्या भागांमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या भूकंपामुळे 1600 इमारतींचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. राष्ट्राध्यक्षांच्या म्हणण्यांनुसार, सोमवारी दुपारपर्यंत 132 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील बेपत्ता नागरिकांचाही शोध घेण्यात येत आहे. भूकंपानंतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू चोको या शहरात होता. कोलंबियामधील सर्वात गरीब वस्ती असलेलं शहर आहे. या भागात गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या समूहाचं वास्तव्य आहे. या घटनेने लहान मुले आणि तरुणांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. काही भागांत घटदाट जंगलात पोहोचणे अवघड आहे. त्यामुळे बचाव पथक जलमार्ग आणि हवाईमार्गाचा वापर करत आहे. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्षांनी झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.  हा भूकंप कोलंबियातील सर्वात शक्तीशाली भूकंप असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles