✍️रूपेश पाटील.
“पराभवाने पाय रोखले नाहीत, उलट जनसेवेची पावले अधिक वेगाने पडली, तिरंगा रॅलीच्या विराट यशाने विरोधकांनाही दखल घ्यायला लावणारे विशाल प्रभाकर परब ठरताहेत कोकणच्या जनमानसातील ‘हक्काचा माणूस’!
‘तो’ हारला नाही तर नवा इतिहास घडवायला उभा राहिला!, कारण –
“हार कर जीतने वाले को बाज़ीगर कहते हैं!”


शाहरुख खानच्या ‘बाजीगर’ चित्रपटातील हा संवाद केवळ पडद्यावरचा एक डायलॉग नाही; तो पराभवाच्या राखेतून विजयाची मशाल पेटवणाऱ्या प्रत्येक जिद्दी माणसाच्या संघर्षाची कहाणी आहे. हार ही शेवटची रेषा नसते, तर नव्या विजयाच्या प्रवासाची पहिली पायरी असते, हे या एका वाक्यातून अधोरेखित होते.
आणि म्हणूनच आज हा संवाद सावंतवाडीच्या राजकीय-सामाजिक पटलावर एका युवा नेतृत्वासाठी अक्षरशः सार्थ ठरताना दिसतो – विशाल प्रभाकर परब!
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात दिग्गज आणि अनुभवी नेतृत्वासमोर हिमतीने उभे राहण्याचे धाडस त्यांनी दाखवले. निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही, परंतु पराभवाने त्यांच्या पावलांना बेडी घातली नाही, उलट त्यांच्या जिद्दीला पंख दिले.
कारण काही माणसं विजयाने मोठी होत नाहीत…
ती पराभवाला कसं सामोरं जातात, यामुळे मोठी होतात!
विशाल परब यांच्या बाबतीतही नेमकं हेच घडलं.
पराभव झाला पण मनोबल हरलं नाही.
राजकीय गणितं प्रतिकूल ठरली, पण जनसेवेची दिशा बदलली नाही.
टीका झाली, पण संयम ढळला नाही.
आव्हानं आली, पण पावलं थांबली नाहीत.


उलट सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यांमध्ये झंझावाती दौरे, जनतेच्या सुख-दुःखात सहभाग, अडीअडचणीच्या काळात मदतीसाठी धाव, युवकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा आणि सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व आरोग्य क्षेत्रातील विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी जनमानसात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
आज विशाल परब हे केवळ ‘नेते’ म्हणून नव्हे, तर ‘आपला माणूस’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.
आणि राजकारणात हीच सर्वात मोठी कमाई असते!
जिथे प्रश्न गंभीर… तिथे विशाल खंबीर!
ही केवळ घोषणा नाही तर त्यांच्या कार्याची जणू ओळख बनली आहे.
पावसापासून छोट्या व्यापाऱ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून छत्र्यांचे वाटप असो…
ग्रामीण भागातील वाढीवस्तीवरील शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा उपक्रम असो…
शाळांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुढाकार असो…
अतिवृष्टीने गोरगरिबांच्या घरांचे अथवा शेतीचे नुकसान झाले असेल तर मदतीचा हात असो…
प्रश्न कोणताही असो त्यामागे माणूस दिसला की विशाल परब यांची पावलं तिथे पोहोचतात, अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे.
आज राजकारणात अनेकजण निवडणुकीच्या मोसमातच जनतेच्या दारात पोहोचतात. निवडणूक जवळ आली की आश्वासनांची बरसात होते आणि मतदान संपलं की अनेक चेहरे पुन्हा अदृश्य होतात.
परंतु विशाल परब यांचा दावा वेगळा आहे –
“निवडणूक असो वा नसो, जनतेत राहायचं आणि जनतेसाठी काम करायचं!”
ही भूमिका केवळ भाषणात नाही, तर त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रमांतून दिसून येते.
टीकेला उत्तर शब्दांनी नाही… तर कर्तृत्वाने!
राजकारणात टीका ही काही नवीन गोष्ट नाही. विशेषतः एखादा युवा चेहरा वेगाने पुढे येऊ लागला की त्याच्यावर टीकेचे बाण अधिक तीक्ष्ण होतात.
विशाल परब यांच्यावरही अनेकदा टोकाची टीका झाली. मात्र त्यांनी प्रत्युत्तर म्हणून वैयक्तिक टीकेचा मार्ग स्वीकारला नाही. संयम राखला, प्रत्येकाचा आदर केला आणि आपल्या कामातून उत्तर देण्याचा मार्ग निवडला.
कदाचित म्हणूनच आज कालपर्यंत ज्यांच्या शब्दांत टीका होती, त्यांच्या ओठांवरही विशाल परब यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा ऐकू येऊ लागली आहे.
ही स्तुती अचानक निर्माण झालेली नाही, तिच्या पाठीमागे दीर्घकाळाची संयमी वाटचाल, विशाल कर्तृत्व आणि निःस्वार्थ दातृत्व आहे.
आणि मग आला १० ऑगस्टचा तो ऐतिहासिक दिवस!

सावंतवाडी शहरात आयोजित ‘हर घर तिरंगा’ रॅलीने शहर अक्षरशः तिरंगामय झाले. राष्ट्रभक्तीचा महासागर उसळला. ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमले.
या विराट रॅलीच्या नियोजनात युवा नेतृत्व विशाल परब यांची भूमिका ठळकपणे अधोरेखित झाली.


हजारो नागरिकांचा सहभाग, शिस्तबद्ध नियोजन, उत्साहाने भारलेले वातावरण आणि तिरंग्याच्या साक्षीने उभा राहिलेला राष्ट्रभक्तीचा विराट सोहळा! – यामुळे या रॅलीने केवळ सावंतवाडीचेच नव्हे, तर संपूर्ण कोकणाचे लक्ष वेधून घेतले.
विशेष म्हणजे, एकेकाळचे राजकीय विरोधकही या नियोजनाची आणि नेतृत्वाची दखल घेण्यास बाध्य झाले.
दिग्गज नेत्यांकडून विशाल परब यांच्या नियोजनाचे आणि नेतृत्वाचे झालेले कौतुक ही वरवरची राजकीय औपचारिकता नव्हती; त्यामागे त्यांच्या विशाल मनाचे, दमदार नेतृत्वाचे आणि मनोभावे केलेल्या सामाजिक दातृत्वाचे प्रतिबिंब होते.
गेल्या दीड दशकापासून विशाल परब यांच्या विविध उपक्रमांभोवती जनतेचा उत्साह दिसून येतो. कालची तिरंगा रॅली म्हणजे त्याच जनविश्वासाच्या प्रवाहाला मिळालेली आणखी एक विराट झेप होती.

पराभवाने नेता घडत नाही… पराभवानंतरची वाटचाल नेता घडवते!
याच टप्प्यावर पुन्हा एकदा ‘बाजीगर’ आठवतो.
“हार कर जीतने वाले को बाज़ीगर कहते हैं!”
कारण खरा बाजीगर तोच, जो परिस्थितीने हरवल्यानंतरही स्वतःला हरू देत नाही.
जो टीकेसमोर तुटत नाही…
जो प्रतिकूलतेसमोर झुकत नाही…
जो पराभवाने थांबत नाही…
जो प्रसिद्धीसाठी नव्हे, तर जनतेच्या विश्वासासाठी काम करतो…
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे—
ज्याच्या कर्तृत्वाला बोलण्यापेक्षा काळ स्वतः साक्षीदार बनतो!
विशाल परब यांच्या आजवरच्या वाटचालीकडे पाहिलं तर ‘बाजीगर’ हा संवाद त्यांच्या संघर्षाचं एक प्रभावी रूपक ठरतो.
कालचा पराभव आजच्या जिद्दीला धार देतोय…
आजची जनसेवा उद्याच्या नेतृत्वाची पायाभरणी करतेय…
आणि आजचा जनविश्वास भविष्यातील मोठ्या पर्वाची चाहूल देतोय!
सावंतवाडी मतदारसंघाला शांतता, संयम, संस्कार आणि अध्यात्मिक सेवाभावाची समृद्ध नेतृत्वपरंपरा लाभली आहे. त्या परंपरेतील चांगल्या गुणांचा आदर राखत, नव्या पिढीच्या आकांक्षा, युवकांची ऊर्जा आणि जनसेवेची तळमळ यांचा संगम घडवणारे युवा नेतृत्व म्हणून विशाल परब यांच्या नावाची चर्चा आज जोर धरताना दिसते.
ही केवळ राजकीय चर्चा नाही.
ही जनमानसात निर्माण झालेल्या विश्वासाची चाहूल आहे.
कारण राजकारणात पद मिळवणारे अनेक असतात;
पण पद नसतानाही जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करणारे फार थोडे असतात.
विशाल परब यांची खरी ताकद कदाचित याच ठिकाणी दडलेली आहे.
त्यांच्या नावातील ‘विशाल’पणा केवळ नावापुरता नसून, मनाच्या विशालतेत, कार्याच्या व्यापकतेत आणि जनतेसाठी उघड्या असलेल्या हातात दिसतो, असे त्यांच्या समर्थकांचे आणि हितचिंतकांचे म्हणणे आहे.
आज कोकणाच्या मातीतून एक संदेश दूरवर पोहोचतो आहे—
“पराभवाने थांबलेला नाही हा प्रवास…
तो आता अधिक वेगाने पुढे निघाला आहे!”
आणि म्हणूनच…
हार मानणाऱ्यांची गर्दी मोठी असते,
पण हार पचवून पुन्हा उभे राहणाऱ्यांची ओळख वेगळी असते.
जिंकणारे अनेक असतात पण पराभवातून स्वतःला घडवून जनतेच्या मनात घर करणारेच खरे ‘बाजीगर’ ठरतात!
आज विशाल प्रभाकर परब यांची वाटचाल याच नव्या पर्वाची नांदी ठरत आहे, असे चित्र सावंतवाडीच्या राजकीय-सामाजिक क्षितिजावर स्पष्टपणे उमटताना दिसत आहे.
कोकणच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या या विशाल मनाच्या युवा नेतृत्वाला पुढील वाटचालीसाठी श्री देव पाटेकर, श्री देव उपरलकर आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी उदंड आयुष्य, उत्तुंग यश आणि जनसेवेची अखंड शक्ती देवो; त्यांच्या हातून समाजहिताचे, जनहिताचे आणि राष्ट्रहिताचे असंख्य विधायक उपक्रम घडत राहोत—हीच मनःपूर्वक प्रार्थना!
जनतेच्या मनात घर करणाऱ्या या ‘विशाल’ नेतृत्वाला मनोभावे सलाम!
कारण…
खेळ अजून संपलेला नाही!
डाव अजून बाकी आहे!
आणि ‘विशाल – बाजीगर’ अजून मैदानात आहे!




