सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील आजगाव – धाकोरा परिसरातील प्रस्तावित मायनिंग आणण्याचे कार्य शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केल्याचे काही जण भासवत आहेत. मात्र ही माहिती पूर्णतः चुकीची आहे. कारण जेव्हा येथे मायनिंग होणार?, अशी माहिती कळविण्यात आली होती, त्यावेळी आम्ही सर्व धाकोरा परिसरातील सुज्ञ जनतेने मंत्री दीपक केसरकर यांना भेटून निवेदन दिले आहे. त्याच वेळी मंत्री केसरकर यांनी “आपल्याला नको असलेला प्रकल्प आपण कधीही होऊ देणार नाहीत.?”, असे आम्हाला आश्वासित केले आहे. त्यामुळे “मी हे करेन, ते करेन”, असे सांगणारे फक्त आता येथील सुज्ञ जनतेला आश्वासने देत फिरत आहेत, हे साफ चुकीचे आहे. उलटपक्षी मंत्री केसरकर यांनी आजगाव आणि धाकोरा या गावांना निवेदनाद्वारे जी जी मागणी होती ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. किंबहुना विकास कामे केली सुद्धा आहेत. याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. म्हणून येथील जनता भूलथापांना बळी पडणार नाही, असे धाकोरा सरपंच स्नेहा मुळीक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
धाकोरा परिसरातील सुज्ञ जनता सर्व जाणते, कोणाच्याही भूलथापांना बळी पडणार नाही! ; विकासाच्या अनुषंगाने आमचा पाठिंबा केसरकरांनाच.!, धाकोरा सरपंच स्नेहा मुळीक यांचे वक्तव्य.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


