सांतवाडीच्या वॉव किड्स रायन प्री स्कूलमध्ये प्ले झोन उद्घाटन सोहळा उत्साहात साजरा.

सावंतवाडी : दिनांक ७ नोव्हेंबर २०२४ रोजी वॉव किड्स रायन प्री स्कूल, सावंतवाडी येथे मोठ्या उत्साहात प्ले झोन उद्घाटन सोहळा साजरा करण्यात आला. येथे वयोगट २ ते ९ वर्षांच्या लहान मुलांकरिता विविध खेळांची सुविधा जसे की, बॉल पिट, ट्रॅम्पोलिन, झिप लाईन, स्लाईड्स, जंगल जिम, सॅण्ड पिट, करण्यात आली आहे. त्याचबरोबर, ‘ प्रिंटेड अँड प्ले ‘ या संकल्पनेला अनुसरून येथे ‘डॉक्टर’, ‘ब्युटी सलाॅन’, ‘कंस्ट्रक्शन साईट’ यासारखे प्रिंटेड प्ले देखील उपलब्ध करण्यात आले आहे. लहान मुलांच्या ‘ ‘फाईन मोटर स्किल’ व ‘ ग्राॅस मोटर स्किल’ सबळ करण्याकरिता देखील उपयुक्त खेळ उपलब्ध करण्यात आले आहेत. हा प्ले झोन उद्या दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ पासून मुलांसाठी सुरू होईल. तसेच हे प्ले झोन मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व मनोरंजनासठी नक्कीच एक आदर्श स्थळ ठरेल. असा हा आजचा उद्घाटन सोहळा भारत गॅस एजन्सीच्या प्रमुख सौ. रुचा पाटणकर व श्री. रामप्रसाद पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व सौ. कश्मिरा पाटणकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles