सावंतवाडी : दिनांक 14 नोव्हेंबर रोजी मिलाग्रीस हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली व अव्वल स्थान मिळवत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत स्थान मिळवले.
यामध्ये 17 वर्षाखालील गटामध्ये कु. अमुल्य अरुण घाडी याने द्वितीय क्रमांक मिळवला आणि
कु. राम प्रकाश फाले 19 वर्षाखालील गटात 6 वे स्थान मिळवले.
कु.अमुल्य घाडी आणि कु. राम फाले हे दोघे उत्कृष्ट कामगिरीमुळे आगामी राष्ट्रीय स्तरावरील कॅरम स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
प्राचार्य रेव्ह. फा. रिचर्ड सालदान्हा यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.


