शिरोडा : मागील पंधरा वर्षात सावंतवाडी विधानसभा क्षेत्राचा विकास रखडलेला आहे. हा विकास भरून काढण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांना जनतेतून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. अर्चना घारे – परब यांच्या प्रत्येक प्रचार फेरीला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आता विकास साधायचा असेल तर अर्चनाताई शिवाय पर्याय नाही. असा विश्वास जनतेच्या मनात आता दिसत आहे. म्हणूनच अर्चना घारे परब यांना दिवसेंदिवस मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

सर्वसामान्य जनतेचे अपक्ष उमेदवार सौ. अर्चना घारे परब यांची शिरोडा बाजारपेठेत आज झंझावती अशी प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांकडून “विकासाचे वारे फक्त अर्चना घारे, ईला ईला ईला विकासाचा पाकीट ईला, नको दादा नको भाई, आमका व्हयी अर्चनाताई!” अशा प्रकारच्या अनेक घोषणांनी शिरोडा बाजारपेठ परिसर दणाणून सोडला. यावेळी अर्चना घारे यांनी शिरोडा बाजारपेठेतील व्यापारी वर्गांच्या तसेच घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या.
यावेळी सर्व व्यापारी व जनतेचे मिळणारे आशीर्वाद हे घारे – परब यांना प्रेरणा देणारे व उत्साह वाढविणारा अशा आशयाचे होते.
यावेळी अर्चना घारे – परब यांच्या समवेत वेंगुर्ला पदाधिकारी योगेश कुबल, दीपिका राणे, विक्रांत कांबळी, विशाल बागायतकर, अजित नातू , प्रवीण मेस्त्री, फैजान शेख, आदिती चुडजी, पूनम परब, वनिता मांजरेकर, हृतिक परब, मयूर कामत, विवेक गवस व अन्य पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.


