सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे बंडखोर व अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी त्यांच्या सुविध्य पत्नी वेदिका परब यांच्यासह चराठा शाळा नंबर एक येथे आज सकाळी मतदान केले. यावेळी वेदिका परब म्हणाल्या, मी संपूर्ण मतदार संघ फिरत असताना ग्रामीण भागातील महिलांच्या डोळ्यात अश्रू पाहून प्रचंड वाईट वाटले. तसेच संपूर्ण मतदार संघातील युवकांना गेल्या पंधरा वर्षात कोणताही रोजगार उपलब्ध केला गेला नाही. म्हणून त्यांच्या मनात राग आहे. विशाल परब यांनी आजपर्यंत अनेक गोरगरीब व गरजूंना मदत केली आहे. म्हणूनच त्यांच्या विजयाची पूर्णत: खात्री असून निवडून आल्यानंतर जनतेच्या मनातील राग दूर करून त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम आम्ही करू, अशी बोलकी प्रतिक्रिया वेदिका परब यांनी यावेळी दिली. यावेळी अपक्ष उमेदवार विशाल परब, अमित परब व अन्य उपस्थित होते.

जनतेचे अश्रू पुसणारे काम करणारं, विजयाची पूर्णत: खात्री .! ; वेदिका परबांची मतदान केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


