रुपेश पाटील
सावंतवाडी : अनेक लोकांना थोडे यश मिळाले की ते हुरळून जातात. त्यांचे वागणे हवेत असते आणि त्यांचे पाय जमिनीवर राहत नाही. मात्र या सगळ्या गोष्टींना तिलांजली दिली आहे ती सावंतवाडी येथील यशस्वी युवा उद्योजक आणि सद्या अपक्ष उमेदवारी करून महाराष्ट्रभर चर्चेत असलेले युवा नेतृत्व विशाल प्रभाकर परब यांनी.

आज सकाळी विशाल परब आपल्या सुविद्य पत्नी वेदिका परब यांना सोबत घेऊन चराठा येथील अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे मतदानास गेले. यावेळी शाळेत प्रवेश केल्यावर त्यांनी आपली पादत्राणे शाळेच्या बाहेर काढली. त्यानंतर मतदान कक्षाकडे वळल्यावर त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या एका सामान्य वृद्ध महिलेला साष्टांग दंडवत प्रणाम केला व “आजी बरे आसामां..!” असं मालवणी भाषेत आपुलकीने विचारपूस केली. तेव्हा त्या उपस्थित आजींनीही विशाल परब यांच्या डोक्यावर हात ठेवत त्यांना मायेचा आशीर्वाद दिला. तसेच त्यांनी सपत्नीक रांगेत उभे राहून मतदानाचा पवित्र हक्क बजावला. हे सर्व पाहून तेथे उपस्थित कर्मचारी व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी यांना विशाल परब यांच्या अंगी असलेली प्रचंड विनम्रता भावली. विशेष म्हणजे अल्पावधीतच महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला हा युवा नेता आज आमदारकीची महत्त्वाची निवडणूक लढवत असतानाही त्यांच्या अंगी असलेली सोज्वळता आणि प्रांजळता हे पाहून नक्कीच एक आदर्श युवा कसा असावा?, याचे दर्शन विशाल परब यांनी घडविले आहे. निकाल काहीही असो मात्र डोक्यात कसलाही राग नाही, डोळ्यात गोरगरिबांविषयी आशेचे स्वप्न आणि हृदयात जनतेची आस्था असलेला हा युवा नेता नक्कीच भविष्यात गगनभरारी घेणार, यात कोणतीही शंका नाही.!


