सावंतवाडी : मिलाग्रीस हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. या अव्वल स्थान मिळविलेल्या विद्यार्थी व पालकांचा प्राचार्य फादर रिचर्ड सालधाना सन्मान केला.
कोल्हापूर विभागीय कॅरम स्पर्धा छत्रपती शिवाजी स्टेडियम, रत्नागिरी येथे झाली.या स्पर्धेत विभागामधील विविध शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मिलाग्रिसचे विद्यार्थी कौशल्य, प्रतिभा आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करत आव्हानाला सामोरे गेले तर विभागीय कॅरम स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी आंबोली येथे राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत खेळत यश संपादन केले.
या शाळेचा विद्यार्थी कु. अमुल्य घाडी यांने १७ वर्षांखालील मुलांच्या गटात राज्य स्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
तर कु. राम फाले (मिलाग्रीस ज्युनियर कॉलेज) याने १९ वर्षांखालील मुलांच्या गटात सहावा क्रमांक आणि सुवर्णपदक मिळवले.
तसेच कु.आस्था लोंढे हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात विभागीय कॅरम स्पर्धेत सहावा क्रमांक पटकावून आंबोली येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होत खेळाचे चांगले प्रदर्शन केले.
या कु. अमुल्य घाडी, कु. राम फाले, व कु. आस्था लोंढे यांनी विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल मिलाग्रिस हायस्कूलच्या मैदानावर प्राचार्य रेव्ह.फार.रिचर्ड सालदान्हा यांनी विद्यार्थी व पालक यांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.


