सावंतवाडी: सह्याद्री पट्ट्यात खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना तब्बल 8578 मताधिक्य मिळाले. आंबोली, माडखोल, कोलगाव व तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघान महायुतीला पसंती दिल्याबद्दल भाजपचे मंडल अध्यक्ष, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांनी जनतेसह महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत.
सह्याद्री पट्ट्यात भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद आहे. महायुतीचे नेते नारायण राणे व रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या भागता काम केलं. आंबोली, माडखोल, कोलगाव व तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना तब्बल 8578 मताधिक्य मिळाले अशी माहिती भाजप मंडल अध्यक्ष रविंद्र मडगावकर यांनी दिली. तसेच केसरकर यांच्या विजयासाठी मेहनत घेणाऱ्या महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे त्यांनी आभार मानले. जनतेला धन्यवाद दिले. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांत सह्याद्री पट्ट्यात असाच निकाल दिसून येईल असा विश्वास भाजप मंडल अध्यक्ष रविंद्र मडगावकर यांनी व्यक्त केला. तसेच विजयासाठी मेहनत घेणारे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते, आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे त्यांनी आभार मानले.