Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज करावेत.!

रत्नागिरी : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमांतर्गत सन २०२४-२५ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता रक्कम रूपये २४.७३ लाखाचा कार्यक्रम जिल्ह्यासाठी मंजूर आहे. या योजनेमधे सहभागी घेण्यासाठी जिल्हयातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी आज्ञावलीवर अर्ज करावेत. तसेच आपल्या नजिकच्या आपले सरकार ई-सेवा केंद्रामधे जाऊन किंवा https://mahadbtmahait.gov.in या आज्ञावलीवर देखील अर्ज करता येऊ शकेल. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फलोत्पादनाशी निगडीत योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
योजनेच्या अधिक माहितीसाठी गावपातळीवरील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक तसेच मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
या योजनेमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारीत रोपवाटीका, क्षेत्रविस्तार घटकांतर्गत ड्रगन फ्रुट या Exotic Fruit Crop,, पुष्पोपादन, फळपिके, मसाला पिके, अळिंबी उत्पादन, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, नियंत्रित शेती (ग्रीनहाऊस, शेडनेट, प्लॅस्टिक मल्चिंग), फलोत्पादन यांत्रिकीकरण, मुनष्यबळ विकास कार्यक्रम, काढणीत्तोर व्यवस्थापन (पॅक हाऊस, प्रक्रिया युनिट, रायपनिंग चेंबर) आणि पणन सुविधा इ. विविध बाबींचा समावेश आहे. यामध्ये या वर्षी प्रामुख्याने मधुमक्षिका पालनासाठी तरतूद करण्यात आली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles