Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

नव्या सरकारचा शपथविधी कधी? तारीख ठरली ; ‘ह्या’ भाजप नेत्याने सांगितला संपूर्ण प्लॅन.

मुंबई : महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. त्यातच राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महायुतीकडून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे बोललं जात आहे. तसेच मुख्यमंत्र्यांसोबतच भाजपचे १० आमदार, शिवसेना शिंदे गट 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चाही रंगली आहे. त्यातच आता नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार याची तारीख समोर आली आहे.

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी नुकतंच एका मराठी वृत्त वाहिनीशी संवाद साधला. यावेळी रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तसेच मुख्यमंत्री कोणाचा होणार, यावरही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले.

येत्या ३० तारखेला नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल. भाजपसह इतर पक्षांचे नेते कार्यकर्ते यांना त्यांचा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटत आहे. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री का होऊ नये अशी प्रत्येक पक्षाची ही भावना असते. त्यामुळे सर्वजण मागणी करत आहेत. एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज नाहीत. या फक्त चर्चा आहेत. तसेच मुख्यमंत्रि‍पदाचा आणि मंत्रि‍पदाचे फॉर्म्युला एकत्रित बसून ठरवला जाईल, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.

20 आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ?

दरम्यान महायुतीकडून लवकरच सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह दिल्लीत बैठकांवर बैठका पार पडताना दिसत आहेत. त्यातच आता नवीन सरकार कधी शपथ घेणार, मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी माहिती समोर आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, असेही बोललं जात आहे. यात भाजपचे १० आमदार, शिवसेना शिंदे गट 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकनाथ शिंदेंचा राजीनामा

त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राजभवनात दाखल झाले. यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सोपवलं आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles