वेंगुर्ला : नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग जि. प. समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग यांच्या वतीने नशा मुक्त भारत अभियानांतर्गत वैंगुर्ला जि.प. शाळा क्रं. २ येथे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी व्यसनमुक्ती संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी सर्वांना व्यसनाचे प्रकार, कारणे, परिणाम, उपाययोजना या बाबतीत सविस्तर माहिती दिली.

आपण संविधानाच्या मदतीने, संविधानातील कलम ४७ च्या आधारे आपण व व्यसनमुक्त समाज निर्माण करु शकतो. या कार्यक्रमासाठी नशाबंदी मंडळाचे सिंधुदुर्ग जिल्हा समितीचे प्रमुख सल्लागार डॉ. संजीव लिंगवत उपस्थित राहून वाढत्या व्यसनांना आळा घालण्यासाठी आपण सर्वजण व्यसनमुक्तीच्या प्रसार कार्यात सहभागी होऊया, असे मत व्यक्त केले. यावेळी शाळेला महामानवाचे व्यसनमुक्ती विचार पुस्तिका तसेच कलम ४७ प्रत देण्यात आली. शेवटी अर्पिता मुंबरकर यांनी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.


