Sunday, May 18, 2025

Buy now

spot_img

शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या कारभारा विरोधात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

सिंधुदुर्गनगरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग या संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिष्ठाता डॉ. मनोज जोशी यांच्या मनमानी व बेताल कारभाराबाबत तसेच समस्त अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत झालेल्या अपमानास्पद व असभ्य वर्तणुकीबाबत चक्क मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे.

मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात ते म्हणतात की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग चे अधिष्ठाता डॉ. मनोज जोशी यांच्या मनमानी, बेताल कारभारा मुळे सर्व वर्ग १ ते ४ कर्मचारी त्रस्त आहेत.

१) डॉ. मनोज जोशी यांच्या विरुध्द महाविद्यालयाच्या विषाखा कमिटीकडे या कार्यालयात कार्यरत १ असलेल्या वर्ग-४ कर्मचारी महिलेशी केलेल्या असभ्य वर्तणुकी बाबत दिनांक ०९/०१/२०२३ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. विषाखा कमिटीच्या अध्यक्षा डॉ. प्राजक्ता थेटे, सहयोगी प्राध्यापक आहेत. सदरची तक्रार प्राप्त होताच तत्कालीन कार्यालयीन अधिक्षक व प्रशासकीय अधिकारी यांनी त्यावर शेरा मारला व तत्कालिन अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव सर यांनी चौकशी करिता सदरचा अर्ज विशाखा कमिटीकडे वर्ग केला.

२) डॉ. पी.डी. गुरव, हे अधिष्ठाता पदावर असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथील एम.बी.बी.एस. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या मानवी मृतदेह आवश्यक असतात. त्याकरीता डॉ. मनोज जोशी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथून ५ मृतदेह आणण्यास सांगीतले होते. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज यांनी ५ मृतदेह डॉ. जोशी यांना सुपूर्त सुध्दा केले परंतू, डॉ. मनोज जोशी यांनी डॉ. पी. डी. गुरव तत्कालीन अधिष्ठाता यांचे आदेश झुगारुन केवळ दोनच मृतदेह महाविद्यालयाकडे हस्तांतरीत केले. सदरची बाब तत्कालीन अधिष्ठाता डॉ. गुरव यांच्या निदर्शनास आल्यावर फोन वरील चौकशीअंती उर्वरीत तीन मृतदेह हे डॉ. जोशी यांनी त्यांच्या मित्राच्या कॉलेजला परस्पर दिल्याचे सांगितले. सदरचे मृतदेह परत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथे तात्काळ जमा करण्याचे आदेशानुसार कालांतराने जमा केले. हि घटना गंभीर आहे. “उपरोक्त दोन्ही घटना ह्या डॉ. जोशी यांच्या प्रोबेशन कालावधी असताना घडलेल्या होत्या.” व सध्यस्थितीत सुध्दा डॉ. मनोज जोशी यांचा प्रोबेशन कालावधी सूरु आहे.

३) मनोज जोशी यांच्याकडे दिनांक १२-०१-२०२४ रोजी पासून अधिष्ठाता या पदाचा अतिरीक्त कार्यभार देण्यात आला. त्यानंतर डॉ. जोशी यांनी हिस्टोपॅथॉलोजी साठी लागणाऱ्या स्लाईड कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर दबाव आणून दरपत्रकाच्या माध्यमातून अवैध खरेदी करण्यास भाग पाडले व त्यांच्या परिचयातील व्यक्तीला सदरचा पुरवठा आदेश देण्यात आला. त्यानंतर सदरच्या स्लाईड महाविद्यालयास प्राप्त झाल्या. परंतू दरातील तफावतीमुळे डॉ. मनोज जोशी, यांनी त्यांच्या अधिपत्याखालील विभागामधील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्राजक्ता थेटे यांना जडसंग्रह नोंदवहीवर सही करण्यास दबाव आणला. परंतू डॉ. थेटे ह्या त्या विभागाच्या विभागप्रमुख नसल्यामुळे त्यांनी जडसंग्रह नोंदवहीवर सही करण्यास नकार दिला. तेंव्हा त्यांना ” तुम्ही आपल्या लायकीत रहा, तुमच्या प्रत्येक मिनिटाचा हिशोब ठेवेन व तुमचा प्रोबेशन कसा पूर्ण होतो ते पाहतो ” अशा पध्दतीने अपशब्द वापरुन त्यांच्या सोबत असभ्य वर्तणूक केली.

४) तसेच शासन आदेश क्र. ससेप्र-११२२/प्र.क्र.२१५/वैसेवा-१ दिनांक १८ ऑक्टोबर, २०२२ अन्वये डॉ. मनोज जोशी यांना प्राध्यापक शरिररचनाशात्र विभामध्ये नियुक्ती देण्यात आली असून, सदर आदेशामध्ये मुद्दा क्र. ७ मधिल तरतूदी नुसार MCI ने प्राधिकृत केलेल्या संस्थेतून Basic Course in Medical Education Technology व Basic Course in Biomedical Research हे कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. सदर कोर्स भारतीय आर्युविज्ञान आयोगाने अनुक्रमे दिनांक २४-०७-२०२३ व दिनांक ३१-१२-२०२२ पर्यंत दिलेल्या कालावधीत पूर्ण करणे उमेदवारस बंधनकारक आहे असे नमूद असल्यानमुळे सदर कालावधीत उपरोक्त नमूद प्रमाणपत्र सादर न करुशकल्यास उमेदवाराची सेवा समाप्त करण्यात येईल असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. डॉ. मनोज जोशी, यांना सदरची प्रमाणपत्रे विहित दिनांकास सादर न केल्यामुळे दिनांक ०२/०१/२०२४ रोजीच्या पत्रान्वये विचारणा करण्यात आली होती तसेच वरिल बाब ही वरिष्ठ कार्यालयास अवगत करण्यात आलेली होती. याचा मनात राग घरुन श्री. मनोज जोशी अधिष्ठाता यांनी या संस्थेत कार्यरत असलेले श्री. जगन्नाथ नवले, प्रशासकीय अधिकारी व श्री. महेश सोनावणे, कनिष्ठ लिपीक, आस्थापना यांना ज्ञापन काढून जाणीवपूर्वक त्रास देण्यात आला.

५) डॉ. संतोष फुपरे सहयोगी प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र यांचे अत्यंत महत्वाचे घरगुती काम असलेने त्यांनी दिनांक १४-०२-२०२४ रोजी कार्यालयास किरकोळ रजा मिळणेबाबत विभागप्रमुखांमार्फत रितसर विनंती अर्ज केला होता. परंतू त्यांना ज्ञापन देऊन खुलासा मान्य न करता रजा विनावेतन केली आहे. तसेच संबंधीत अधिकारऱ्यास “गोपनिय अहवाल प्रतिकुल लिहून आपण नियमीत कसे होता ते बघतो” अशा प्रकारची घमकी दिली आहे.

६) डॉ. वैषाली प्रल्हाद्भंडारे, वैद्यकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग ह्या दिनांक १९/०७/२०२४ रोजी कामावर हजर होण्यासाठी आले असता त्यांना कामावर हजर करुन न घेता त्यांना अपमानास्पद वागणूक दिली व त्यांना वैद्यकीय मंडळाकडे हजर रहाण्यासाठी कळविण्यात आले आहे.

७) श्री. स्वप्निल खुळे, अधिपरिचारक, यांचे बाबतीत दिनांक ३०/०७/२०२४ रोजी सायं. ६.३० च्या दरम्यान डॉ. मनोज जोशी, अधिष्ठता यांना संबंधीतास मोबाईलवरुन अत्यंत खालच्या पातळीवर शिवीगाळ केली व दिनांक ३१/०७/२०२४ रोजी सकाळी ११.०० दरम्यान अधिपरिचारीका श्रीमती नेरुरकर व श्रीमती परब यांच्या समोर “भोसडीच्या तुला माज आला का?” अशा शब्दात विचारणा करण्यात आली. श्री. स्वप्निल खुळे, अधिपरिचारक या पदावर रुग्णालयाकडे लिपीक कर्मचारी नसलेने तेथील पगारबीले व आकस्मिक बिले तयार करतात. परंतू त्यांना अशाप्रकारची वागणूक दिल्यामुळे श्री. खुळे हे प्रचंड मानसिक दबावाखाली आहेत व त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे.

८) श्री. गुरुराज तेली, कंत्राटी कर्मचारी यांना दिनांक १८.७.२०२४ रोजी कार्यालयीन कामकाज करीत असताना संबंधीत कर्मचा-याकडून कामाच्या ओघामध्ये कांही किरकोळ चूक झालेवरुन संबंधीत कर्मचा-यास शिवीगाळ करुन संबंधीत कर्मचाऱ्यास अपमानास्पद वागणूक दिली व कामावरुन काढून टाकतो अशी धमकी दिली आहे.

९) श्री. महेश सोनावणे, कनिष्ठ लिपीक हे वर्ग ४ पदावरुन वर्ग ३ या पदावर पदोन्नतीने शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, सिंधुदूर्ग येथे दिनांक १७/०७/२०२३ रोजी हजर झाले आहेत. सध्या त्यांच्याकडे आस्थापना या कार्यासनाचा चार्ज आहे. अध्यापकांची माहिती संचालक कार्यालयाला पाठविण्यासाठी संबंधीत अध्यापकाची माहिती विषयांकीत अध्यपकाकडे मागीतली असता, डॉ. मनोज जोशी यांनी श्री महेश सोनावणे आस्थापना लिपीक यांना “तुम्ही संबंधीतांकडे माहिती का मागीतलीत?” या कारणास्तव ज्ञापन देऊन व त्यांना अपमानास्पद वागणूक दिली त्यामुळे संबंधीत कर्मचाऱ्याचे मानसिक स्वास्थय बिघडुन त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. परिणामी त्यांना उच्चरक्तदाबाचा त्रास सुरु झाला आहे.

१०) श्री. विलास राठोड, उच्चश्रेणी लघुलेखक हे दिनांक ६.१२.२०२३ रोजी सरळसेवेने शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, सिंधुदूर्ग येथे हजर झाले आहेत. संबंधीत कर्मचाऱ्यास शासकिय कामाचा अनुभव नसलेमुळे दैनंदिन कामकाजामध्ये किरकोळ चुक होत असते. परंतु डॉ. जोशी हे संबंधीत कर्मचाऱ्यास अवमानकारक बोलतात. दिनांक १९.६.२०२४ रोजी डॉ. जोशी यांनी श्री. राठोड यांना मोबाईल वरुन शिवीगाळ केली “जारत माजलास का, तु आपल्या चड्डीत राहा” त्यामुळे संबंधीत कर्मचाऱ्यांने या संस्थेत काम करणे इच्छुक नसून, अन्य संस्थेत बदलीकरणेबाबत मा. संचालनालय, मुंबई यांचेकडे बदली करीता अर्ज दिला आहे.

११) डॉ. विशाखा पाटील ह्या कंत्राटी सहयोगी प्राध्यापक (OBGY) या पदावर रुजू झाल्या असून त्या नाम मात्र रुजू झाल्या आहेत. ते कर्तव्यावर हजर नराहता त्यांचा स्वतःचा दवाखाना सांभाळत आहे व शासनाचे काम न करता घरी बसून पगार घेत आहेत. याला डॉ. मनोज जोशी अधिष्ठाता यांचा नियमबाह्य हेतूपुरस्सर सपोर्ट आहे. त्यामुळे (OBGY) या विभागात काम करणाऱ्या इतर अधिकाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे.

१२) डॉ. रवि टाले सहाय्यक प्राध्यापक दंतशास्त्र यांना शुल्लक कारणावरुन नोकरी वरुनच काढून टाकले आहे.

१३) सुरक्षा अधिकारी श्री. विजय गुरव यांनी दिनांक २७/०१/२०२४ रोजी मा. नामदार श्रीहसन वैद्यकीय, मुश्रिफशिक्षण व विशेष सहाय्य मंत्री यांच्याकडे डॉ. मनोज जोशी हे ब्लॅकमेल करुन त्यांना आत्महत्तेस प्रवृत्त करित असल्याची तक्रार दिली आहे.

१४) दिनांक ०९/०७/२०२४ व १५/०७/२०२४ रोजी कॉलेज कॉन्सील, खरेदी समिती व ग्रंथालय समितीच्या बैठकीमध्ये अधिष्ठाता डॉ. जोशी यांनी एक पुस्तकांची लिस्ट सर्वासमोर ठेवली व सदर लिस्ट मधील पुस्तकांचीच मागणी सादर करण्याकरिता सर्व विभागप्रमुखांवर दबाव आणला व डॉ जोशी यांना मंत्रालयातून दबाव असुन” जर या लिस्ट प्रमाणे प्रस्ताव सादर केला नाही तर तुमची गडचिरोलीला बदली करतो” अशी मंत्रालयातील एका व्यक्ती कडून त्यांना धमकी मिळाली आहे असे सांगितले. दिनांक १८/०७/२०२४ रोजी मंत्रालयातून शिवम नावाचा एक व्यक्ती पुस्तकासंबंधीच्या अवैध खरेदी बाबत एक पाकिट अधिष्ठाता कार्यालयामध्ये घेऊन आला व दिनांक १९/०७/२०२४ रोजी सदर पाकिट त्याच्याकडून अधिष्ठाता यांनी स्विकारुन श्री. महेश काळे, वरिष्ठ सहाय्यक यांना ठेवण्यास सांगितले. सदर पाकिटासोबत तीच पुस्तकांची लिस्ट होती. पुन्हा दिनांक ०५/०८/२०२४ रोजी त्याच यादी प्रमाणे पुस्तकांची मागणी देण्याबाबत सर्व विभागप्रमुखांवर दबाव आणण्यात आला. व मागणी सादर न केल्यास “तुमचे नाव मंत्रालयात कळविण्यात येईल व तुमची गडचिरोलीला बदली होईल.” अशी डॉ. जोशी यांनी धमकी दिली.

१५) दिनांक ०७/०८/२०२४ रोजी रात्री ९.४४ वाजता डॉ. श्रीकांत मसराम, प्राध्यापक व उपअधिष्ठाता यांना अधिष्ठाता डॉ. मनोज जोशी यांनी कॉल केला असता डॉ. जोशी हे दारु पिऊन बोलत असल्याचे समजले व धमकी वजा भाषेत डॉ. मसराम यांना बोलले की “मला आऊट ऑफ द वे जाण्यास भाग पाडू नका, मी तुम्हाला घरी जाण्यास एकही दिवस रजा देणार नाही व मुख्यालय सोडण्याची परवानगी देणार नाही व मी तुमचा मोबाईल जीओ लोकेशन वर ट्रेस करण्यास सांगेल” व तसा धमकी वजा मॅसेज सुध्दा डॉ. जोशी यांनी डॉ. मसराम यांच्या व्हॉटस्अॅप वर त्यांच दिवशी रात्री १०.२० वाजता पाठवला आहे.

अश्या दडपशाहीच्या वर्तणूकीमुळे हजारो कि.मी. दुरवरुन सिंधुदुर्ग येथे आलेल्या अध्यापक व कर्मचारी यांच्यामध्ये तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.

वरील प्रमाणे अधिकारी व कर्मचारी व अशा पध्दतीने इतरही अधिकारी व कर्मचारी यांना डॉ. मनोज जोशी, अधिष्ठाता यांचेकडून पदाचा गैरवापर करुन वारंवार त्रास देत आहेत. सदर संस्थेमध्ये बरेचसे अधिकारी व कर्मचारी हे इतर संस्थेतून बदलीने व पदोन्नतीने हजर झालेले आहेत.

सद्यःस्थितीत महाविद्यालय व रुग्णालय या दोन्हीही संस्थेमध्ये बरीचशी पदे रिक्त असलेमुळे संस्थेच्या अध्यापन व कार्यालयीन कामकाजामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सद्या कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपमानास्पद वागणूक मिळत असलेमुळे त्यांची काम करणेची मानसिकता राहिलेली नाही व या संस्थेतील अधिकारी, कर्मचारी प्रचंड दबावाखाली काम करीत आहेत. डॉ. जोशी यांचे मनमानी कामकाजामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. पुरेशा अधिकारी व कर्मचाऱ्या अभावी कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असून, डॉ. मनोज जोशी, अधिष्ठाता यांच्या मनमानी कारभारामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. नियमबाह्य कामकाज करणेसाठी संबंधीत कर्मचारी व अधिकारी यांचेवर दबाव आणून त्यांना हवे तसे नियमबाह्य कामकाज करुन घेतात. बरेचसे अधिकारी व कर्मचारी बदलीच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे संस्थेचे हित जोपासले जाणार नाही व भविष्यात संस्था वाढीसाठी घातक आहे. तरी सदर बाबीचे गांभीर्य विचारात घेऊन डॉ. जोशी यांचेकडून अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून अन्य सक्षम व पात्र अधिकारी यांचेकडे देण्यात यावा जेणेकरुन दोन्हीही संस्थेचे कामकाज सुरळीत चालणे सोईचे होईल तसेच डॉ. जोशी यांच्या अधिष्ठाता पदावरील कार्यकाळातील गोपनीय अहवाल व त्याअनुशंगीक असलेल्या शासकीय माहिती / रिपोर्ट वरील अधिकार तात्काळ गोठविण्यात यावेत व वरील सर्व मनामानी कारभार, बेताल वर्तन, पदाचा गैरवापर व नियमबाह्य कामकाज करण्यास प्रवृत्तकरणे संबंधीत चौकशी व्हावी ही विनंती.

प्रत माहिती व उचित कार्यवाहीस्तव सविनय सादर –

१) मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.

२) मा. नामदार श्री. हसन मुश्रिफ, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री, मंत्रालय, मुंबई.

३) मा. पालकमंत्री, सिंधुदुर्ग.

४) मा. प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, मुंबई

५) मा. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष, मुंबई

६) मा. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई

सही/-

सर्व वर्ग १ ते ४ कर्मचारी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles