मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. राज्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक पसंती दिली. महायुतीचा तब्बल 230 जागांवर ऐतिहासिक विजय झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागांवर यश आलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागांवर यश आलं. यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा सुरु होती. अजित पवार यांची शरद पवार गटाच्या आमदारांसोबत गुप्त बैठक झाल्याचीदेखील चर्चा आहे. या चर्चांवर अखेर अजित पवार यांनी आज मौन सोडलं आहे.
शरद पवार गटाचे आमदार तुमच्या पक्षात येणार असल्याची चर्चा आहे, याबाबत काय सांगाल? असा प्रश्न अजित पवारांना आज पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “निकाल लागून अजून तीन दिवस झाले. अजून कशातच काही नाही. मात्र काहीपण बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या संपर्कात कोणीही नाही. मी निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेतली. त्यात आमच्या पराभूत आमदारांचा देखील समावेश होता. त्यांचे मन जाणून घेतलं. निवडून आलेल्या आमदारांना सूचना केल्या. त्यांना मतदारसंघात जाऊन जनतेच्या आभार मानायचं सांगितलं”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
ADVT –




