सावंतवाडी : माजगाव मेटवाडा येथील त्रिमूर्ती मित्रमंडळाने खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी तेथील दत्त मंदिर येथे रात्री आठ वाजता आयोजित केली आहे. बाल व खुला या दोन गटात सदर स्पर्धा होणार आहे. त्रिमूर्ती मंडळातर्फे विविध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्यविषयक उपक्रम राबविले जातात. पंधरा वर्षांखालील बाल गट व पंधरा वर्षांवरील खुला गट अशी स्पर्धा होणार आहे. स्पर्धकांनी आपली आधारकार्ड सोबत आणावीत, असे आयोजकांनी कळविले आहे.
बालगटासाठी प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ५०००, ३०००, २००० व उत्तेजनार्थ ५००, तर खुल्या गटासाठी प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ५०००, ३०००, २००० रुपये व उत्तेजनार्थ पाचशे रुपये व इतर आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धकांनी आपली नावे ३० रोजी सायंकाळी सातपर्यंत नोंदविणे आवश्यक आहे.
नाव नोंदणीसाठी मंडळाचे सदस्य सचिन मोरजकर, माजगाव, मोबाईल-९४२११११६१६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन त्रिमूर्ती मित्रमंडळ, मेटवाडा माजगावने केले आहे.
ADVT –