सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे सातेरी मंदिराच्या बाजूला असलेला ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला. ही घटना बुधवारी पहाटे साडे तीन – चार वाजण्याच्या सुमारास घडली. या ट्रान्सफॉर्मरला बरीच वर्षे झाली होती. काल रात्रीपर्यंत या ट्रान्सफॉर्मरमधून विद्युत प्रवाह सुरळीत वाहत होता. मात्र आज पहाटे सुरु झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट होऊन जळून खाक झाला. यामुळे नेमळे गावातील पहाटेपासून विद्युत प्रवाह खंडित झाला आहे. मात्र लवकरच नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून विद्युत प्रवाह सुरळीत केला जाईल, अशी माहिती नेमळे वायरमन विजय सोन्सूरकर यांनी दिली.
ADVT –