‘एक पेड माँ के नाम!’ – पर्यावरण संवर्धनाचा हरित संकल्प सावंतवाडीत साकार! ; भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते शानदार शुभारंभ! ; जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा जनसंपर्क कार्यालयात वृक्षारोपण.

सावंतवाडी : “आई ही जीवनाची मूळ प्रेरणा, तर वृक्ष हे सृष्टीचे जीवनाधार” या भावनेतून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या अभियानांतर्गत “एक पेड़ माँ के नाम” हा प्रेरणादायी उपक्रम सावंतवाडी येथे उत्साहात पार पडला. भाजपा जनसंपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले.

महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात “आईच्या नावाने एक झाड, पर्यावरणासाठी मोठे योगदान” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. यावेळी विशालजी परब यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा हरित संकल्प करण्यात आला.

यावेळी बोलताना उपस्थितांनी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि घटणारे हरित क्षेत्र यावर मात करण्यासाठी वृक्षारोपण हाच सर्वात प्रभावी उपाय असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमाला सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, सावंतवाडी मंडल युवा अध्यक्ष हितेन नाईक, सावंतवाडी मंडल चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर, शक्ती केंद्रप्रमुख गोविंद साटेलकर, सुदेश नेवगी, पंकज तळसुलकर, अभिजीत धुरी, विनेश तावडे, ओंकार पावसकर, साईप्रसाद भोई, श्रीकांत राज्याध्यक्ष यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण होण्यास मदत होणार असून “एक झाड – एक जबाबदारी” हा संदेश प्रभावीपणे पोहोचला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles