देवगड : देवगड तालुका विज्ञान प्रदर्शन जामसंडे हायस्कूल येथे आयोजित केलेले होते. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थी प्रतिकृती स्पर्धेमध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर, तळेबाजार प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी वृषाली कुळये व कुमारी योगिता रसाळ यांच्या ‘अत्याधुनिक प्रसुती वहन कक्ष’ या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. विद्यार्थिनींचे मार्गदर्शक विज्ञान शिक्षक श्री. जोईल व प्रथम क्रमांक प्राप्त दोन्ही विद्यार्थिनी यांचे संस्था अध्यक्ष संदीप तेली, उपाध्यक्ष श्री. म्हापसेकर, खजिनदार संतोष वरेरकर, सचिव श्री. साटम,तसेच सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक रघुनंदन घोगळे, सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक संघ आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
ADVT –




