सावंतवाडी : नेमळे फौजदार वाडी येथील आंबा बागायतदार तसेच नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य काशीराम परशुराम राऊळ (के. पी. राऊळ ) वय 85 यांचे त्यांच्या राहत्या घरी गुरुवार दि. 28 नोव्हेंबर रोजी रात्रौ आठ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांनी आपल्या जीवन प्रवासात एस टी महामंडळात कंडकटर, नेमळे विकास सेवा सोसायटी चेअरमन, नेमळे कौल उत्पादक संस्थेचे संचालक, तसेच नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी मंडळ सदस्य अशी पदे भूषवून त्यांनी चांगली सेवा दिली. सहकार,शिक्षण, समाजकारण,राजकारण अशा विविध क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते प्रगतीशील शेती व आंबा बागायतदार म्हणून त्यांची ओळख होती. नेमळे गावातील आंबा बागायतदार परशुराम (बाळा )राऊळ, लीलाधर राऊळ यांचे ते वडील होते
त्यांच्या पश्यात दोन मुलगे, सुना, तीन मुली,जावई,एक पुतण्या,नातू,नातवंडे असा परिवार आहे.
सहवेदना – आंबा बागायतदार तसेच नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य काशीराम परशुराम राऊळ यांचे निधन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


