कुडाळ : भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. संविधान हे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. राज्यघटनेने भारत सरकार कायदा १९३५ ची जागा देशाचा मूलभूत प्रशासकीय दस्तऐवज म्हणून घेतली आणि भारताचे अधिराज्य हे भारताचे प्रजासत्ताक बनले. संवैधानिक स्वायत्तता सुनिश्चित करण्यासाठी, त्याच्या रचनाकारांनी कलम ३९५ मध्ये ब्रिटिश संसदेचे पूर्वीचे कायदे रद्द केले, अशी माहिती लघु पाटबंधारे आंबडपाल विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गो. ह. श्रीमंगले यांनी दिली. संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यकारमत ते बोलत होते.

यावेळी ते पुढे म्हणाले, संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते, तेथील नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते. १९५०चे मूळ संविधान हेलियमने भरलेल्या केसमध्ये नवी दिल्लीतील संसद भवनात जतन केले आहे. आणीबाणीच्या काळात १९७६ मध्ये ४२व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे “धर्मनिरपेक्ष” आणि “समाजवादी” हे शब्द प्रस्तावनामध्ये जोडले गेले.
दरम्यान, सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग आंबडपाल, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने संविधान शपथ घेण्यात आली. कार्यालयात लघु पाटबंधारे आंबडपाल विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गो. ह. श्रीमंगले, उपकार्यकारी अभियंता श्री. रा. कि. सुपे, तसेच शाखा अभियंता श्री. रमेश जोशी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह शपथ ग्रहण केली.
तसेच लघु पाटबंधारे तलाव, आडेली येथे देखील लघु पाटबंधारे आंबडपाल विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गो. ह. श्रीमंगले, उपकार्यकारी अभियंता श्री. रा. कि. सुपे, तसेच शाखा अभियंता श्री रमेश जोशी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह शपथ ग्रहण केली.
ADVT –



