Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर तर उपाध्यक्षपदी संतोष राऊळ!

सचिव पदी बाळ खडपकर, उपाध्यक्षपदी आनंद लोके, बंटी केनवडेकर व किशोर जैतापकर

सिंधुदुर्गनगरी :जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर व सचिव पदी बाळ खडपकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड शुक्रवारी झालेल्या जिल्हा पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाली. अखिल मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय संघटनेच्या प्रतिनिधी पदी गणेश जेठे यांचीही बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी पत्रकारांचे नेते ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, माधव कदम,संपादक संतोष वायंगणकर, अण्णा केसरकर, संपादक संदीप देसाई, नंदकिशोर महाजन, हेमंत कुलकर्णी अभिमन्यू लोंढे एकनाथ पवार संतोष कुलकर्णी, प्रमोद ठाकूर रवी गावडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा व जिल्हा कार्यकारणी निवड शांततेत व बिनविरोध झाली.

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ नूतन कार्यकारिणी
अध्यक्ष उमेश तोरसकर,सचिव बाळ खडपकर
उपाध्यक्ष चार आनंद लोके,बंटी उर्फ विद्याधर केनवडेकर, संतोष राऊळ,किशोर जैतापकर
खजिनदार संतोष सावंत, महेश सरनाईक (एक एक वर्ष विभागून )सहसचिव प्रवीण मांजरेकर
कार्यकारणी सदस्य.राजन नाईक कुडाळ,लवू महाडेश्वर सिंधुनगरी,लक्ष्मीकांत भावे कणकवली,अमित खोत मालवण,प्रशांत वाडेकर देवगड,महेंद्र मातोंडकर वेंगुर्ला,सुहास देसाई दोडामार्ग. व निमंत्रित सदस्य म्हणून देवयानी वरसकर अशी जिल्हा कार्यकारणी बिनविरोध निवडण्यात आली.
ही सभा सिंधूनगरी येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भावनांमध्ये संपन्न झाली. या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य गणेश जेठे यांनी सभागृहाचा सूर पाहून, पत्रकार संघाच्या ज्येष्ठ व मार्गदर्शक सभासदांच्या, तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या स
सूचना विचारात घेऊन बिनविरोध निवडणूक होण्यासाठी कौशल्य वापरले. व एक मुखी ही निवडणूक निवड केली.
सभेच्या सुरुवातीला पत्रकार तसेच पत्रकारांच्या दिवंगत नातेवाइकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.तर समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.या सभेत वार्षिक जमा खर्च तसेच इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली. पत्रकार भवानाच्या सर्व कामकाजाचा आढावा या सभेत घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हा पत्रकार संघाने तातडीने करारनामा पूर्ण करून घ्यावा. पत्रकार भवनाचे उत्पन्न व येणारा खर्च यावर लक्ष द्यावे अशा सूचना सभासदांनी केल्या.
यावेळी रमेश जोगळे,अजित सावंत, भगवान लोके, प्रकाश काळे, महेश रावराणे,महेश सरनाईक, राजू तावडे, अयोध्या प्रसाद गावकर,राजू मुंबरकर, लखू खरवत ,एकनाथ पवार, हरिश्चंद्र पवार, दाजी नाईक, मंगल कामत, विजय देसाई, संदीप गावडे, नंदकुमार आयरे, संतोष गावडे, प्रमोद म्हाडगुत, मनोज चव्हाण, वैशाली खानोलकर, मंगल कामत नंदू कोरगावकर आधी पत्रकार सभासदानी उपस्थित राहत चर्चेवेळी व कार्यकारणी निवडीत सहभाग घेतला. व ही सभा सुरळीत व शांततेत संपन्न झाली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles