रत्नागिरी : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील ग्रामदेवता श्री जाकादेवीच्या मंदिरात देवदिवाळी निमित्त एक दिवसीय जत्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली. या देवदिवाळी उत्सवानिमित्त मंदिरात श्री जाकादेवी, जुगादेवी, मानूबाय या देवींना मुखवटे लावले जातात. तसेच देवीची पूजा, आरती सर्व भक्तगणांच्या उपस्थितीत करण्यात आली.
गावखडीतील श्री जाकादेवी नवसाला पावणारी, संकटसमयी हाकेला धावणारी जागृत देवी असल्याने देवदिवाळीनिमित्त एक दिवसीय जत्रेत भाविकांची अलोट गर्दी दिसून आली. देवीची ओटी भरण्यासाठी सुवासिनी मुंबई, पुणे, रत्नागिरी आदी भागातून मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत.
ADVT –




