Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

Big News – महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? ; फैसला उद्याच होणार.!

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकांचा निकाल  दिवस झाले आहेत. परंतू राज्याचा मुख्यमंत्री नक्की कोण होणार याचा निर्णय झालेला नाही. या दरम्यान केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या विजय रुपानी यांनी एक महत्वाची घोषणा केलेली आहे. उद्या बुधवारी भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाणार आहे. आणि भाजपाच्या पक्ष श्रेष्ठींना या संदर्भात कळवले जाईल. विधीमंडळ नेत्याच्या निवडीनंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण?, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्रात भाजपा प्रणित महायुतीला मोठा विक्रमी विजय मिळाला असला तरी मुख्यमंत्री पदाचे नाव निश्चित झालेले नाही.महाराष्ट्रात ५ डिसेंबर रोजी नवीन मुख्यमंत्री शपथ होणार आहे. त्यामुळे सर्वांची नजर उद्या होणाऱ्या भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीकडे लागली आहे. भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. भाजपाने या बैठकीला केंद्रातून केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांना पाठविले आहे.

प्रथम हायकमानला निर्णय सांगू..? 

‘मी मुंबईत जात आहे. निर्मला सितारमन या देखील मुंबईत मंगळवारी सायंकाळी येत आहेत. उद्या सकाळी ११ वाजता महाराष्ट्र भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्याआम्ही चर्चा विनिमय करु. त्यानंतर सर्व संमतीने विधीमंडळ पक्ष नेत्याची निवड होईल. नावाची घोषणा करण्यापूर्वी पक्ष श्रेष्टींना कळविले जाईल. त्यानंतर नावाची घोषणा होईल. आमच्या पक्षश्रेष्ठींनी तिन्ही घटक पक्षांशी चर्चा केलेली आहे त्यामुळे यात काही अडचण नाही.सर्वकाही सुरळीत आणि सर्व संमतीने होईल, असे विजय रुपानी यांनी म्हटले आहे.

ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles