सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा परिसरात अत्यंत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या मायनिंगमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे या ठिकाणी सुरू असलेले मायनिंगचे प्रकल्प तात्काळ बंद करण्यात यावेत. अन्यथा पंचक्रोशीतील ग्रामस्थांना घेऊन 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडू, असा इशारा मळेवाड जिल्हा परिषद मतदार संघ युवा संघटक नी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, साटेली तर्फ सातार्डा गावात मोठ्या प्रमाणात मायनिंग सुरु असल्यामुळे त्याचा फटका स्थानिकांना बसत आहे. मायनिंगमुळे स्थानिकांना रोजगार मिळेल या आशेने स्थानिकांनी सुरुवातीला होणाऱ्या त्रासाकडे फारसे गांभीर्याने पाहिले नव्हते. मात्र – सदर मायनिंगमुळे स्थानिकांना कोणताही फायदा झालेला नाही. मात्र स्थानिक पर्यावरणाचे एक अतोनात नुकसान झालेले असून मोठमोठे डोंगर बेकायदेशीररीत्या मायनिंगसाठी लय तोडल्याने त्याची माती बागायतदार, शेतकरी यांच्या शेतीबागायतीत घुसुन जमिनी नापीक झाल्या, फळझाडे नष्ट झाली.तसेच ब्लास्टींगमुळे पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बंद होऊन पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असून ग्रामस्थांच्या घरांना भेगा पडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मायनिंगमुळे धुळ निर्माण होऊन ग्रामस्थांमध्ये, लहान मुलांना श्वसनाचे विकार निर्माण झालेले आहेत. तसेच भरगाव वेगाने होणाऱ्या मायनिंग वाहतुकीमुळे शाळकरी मुले, ग्रामस्थ यांना रस्त्यावरुन फिरणे अशक्य झाल्याने मुलांना जीव
मुठीत घेऊन शाळेत जावे लागत आहे. तसेच वनजमिनीत ब्लास्टींग करुन मायनिंग केल्याने वन्यप्राणी बिबटे, गवारेडे राजरोस लोकवस्तीत पुसत असल्यामुळे प्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. सदरचे मायनिंग बंद करावे, यासाठी वारंवार आपल्याकडे तक्रार अर्ज, विनंत्या, निवेदने दिलेली होती. तसेच उपोषणे देखील केलेली आहेत. मात्र आमच्या समस्यांकडे कोणत्याही प्रकारे लक्ष देण्यात आलेला नाही, त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव प्रस्तुत तक्रार अर्जाद्वारे कळविणेत भाग पडत आहे की, आमच्या मागणीची येत्या पंधरा दिवसात योग्य ती दखल घेऊन साटेली तर्फ सातार्डा गावातील मानिंग प्रकल्प पूर्णपणे बंद करुन, आमच्या झालेल्या नुकसानीचा माझे समवेत पंचनामा करुन आम्हांस नुकसान भरपाई अदा करणेत यावी. अन्यथा आम्हाला सर्व ग्रामस्थांना दि.२६ जानेवारी २०२५ रोजी आपले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या मागण्या मान्य होऊन नुकसान भरपाई मिळेपर्यंत उपोषण करणे भाग पडेल.आमच्या उपोषणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली व शासनाची राहील, असेही त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
ADVT –




