Sunday, November 9, 2025

Buy now

spot_img

व्हॉलीबॉल स्पर्धेत मांद्रे गोवा विजेता तर चिवला बीच मालवण उपविजेता! ; आरोंदा येथे श्री देव राष्ट्रोळी कला-क्रीडा मंडळ देऊळवाडी यांचे आयोजन, अमेय आरोंदेकर यांनी पुरस्कृत केलेल्या व्हॉलिबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

सावंतवाडी : तालुक्यातील आरोंदा येथे श्री देव राष्ट्रोळी कला क्रीडा मंडळ देऊळवाडी यांनी आयोजित केलेल्या व अमेय आरोंदेकर यांनी पुरस्कृत केलेल्या व्हॉलिबॉल स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला
श्री देव राष्ट्रोळी कला क्रीडा मंडळ देऊळवाडी आयोजित सिंधुदुर्ग व गोवा मर्यादित भव्य दिव्य प्रकाश झोतातील हॉलीबॉल स्पर्धा ३०नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रुपये १५०००/ – व आकर्षक चषक , द्वितीय पारितोषिक रुपये १०,०००/- व आकर्षक चषक तसेच वैयक्तिक बक्षिसे श्री अमेय विजय आरोंदेकर यांनी पुरस्कृत केली होती.
ही स्पर्धा आरोंदा येथील श्री देव राष्ट्रोळी मंदिर येथे आयोजित केली होती. या स्पर्धेत गोवा राज्यातील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघांनी सहभाग घेतला होता. प्रकाश झोतातील या स्पर्धेतील प्रथम विजेता ठरला तो सेव्हेन स्टार मांद्रे गोवा संघ तर उपविजेता संघ चिवला बीच मालवण.
या स्पर्धेतील वैयक्तिक बक्षीस म्हणून बेस्ट स्मैशर – बबलू तारी,(मालवण )बेस्ट डिफेंडर – जॉन्टी फर्नांडिस (चिवला बीच मालवण) ,बेस्ट सर्विसर – सानिश चोडणकर (सेव्हेन स्टार मांद्रे गोवा) बेस्ट सेटर – लाडू ( सेव्हेन स्टार मांद्रे गोवा) आणि सपर्धेतील उत्कृष्ठ खेळाडू म्हणून साहिल ( सेव्हेन स्टार मांद्रे गोवा) या खेळाडूंची निवड करण्यात आली.
या स्पर्धेतील विजेत्यांना श्री अमेय विजय आरोंदेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून चंद्रकांत नाईक सर आणि राधाकृष्ण पेडणेकर सर यांनी काम पाहिले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री देव राष्ट्रोळी कला क्रिडा मंडळ देऊळवाडी मंडळाच्या सदस्यांनी मेहनत घेतली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles