सावंतवाडी : प्रत्येक भागात कोणताही गैरव्यवहार होऊ नये यबाबत आपल्या जिल्ह्यात सुसज्ज असलेल्या पोलिस प्रशासनास परराज्यातील येणाऱ्या व्यक्तींचे नामनिर्देशन पत्राचा अनुक्रमांक लेखी आढावा घेऊन नोंद करून ती सम्बन्धित शासकीय यंत्रणेवर पाठपुरावा म्हणून अशा गैरवर्तवणुकीच्या कर्यवाहिस आळा घालण्यासाठी उपयोगी ठरते. मग सद्य:परिस्थितीत आपल्या गावात तालुक्यात जिल्ह्यात असे बांग्लादेशी रहिवासी वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणी संबंधित पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करून त्यांची हाकलपट्टी करावी. आता किंवा या पुढे एकही बांग्लादेशातील व्यक्ती भारत सरकारच्या हद्दीत प्रवेश करू शकणार नाही, याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच आपल्या परिवारात किंवा आजूबाजूच्या परिसरातील जर कोणत्याही कामासाठी बांग्लादेशातील कोणीही व्यक्ती वास्तव्यास असतील तर त्यांना तातडीने तिथून हाकलून लावले पाहिजे. अन्यथा मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठनतर्फे प्रत्येक गावात तालुक्यात जिल्ह्यात सुसज्ज राहून, या अशा देश द्रोहीना जिथे मिळतील तिथे जशास तसे उत्तर दिले जाईल आणि अशा वेळेस जर कायदा सुव्यवस्था उल्लंघन झाल्यास मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन भारततर्फे कोणताही कार्यकर्त्यास दोषी आढळल्यास कारवाई करू नये,असे पोलीस कर्मचाऱ्यांना मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठनतर्फे प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी जाहीर आवाहन केले आहे.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात एकही बांग्लादेशी घुसखोराला थार देऊ नये. तातडीने या बंडखोरांच्या मुसक्या आवरून जशास तसं उत्तर दिल्याशिवाय यांची सुटका होऊ नये, असे आवाहन मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन तर्फे प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून कळविले आहे.
ADVT –





