कणकवली : माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थी हा सर्वगुण संपन्न झाला पाहिजे. बालकांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी जे जे हवे ते सहकार्य करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.
कणकवली तालुक्यातील फोंडा एज्यूकेशन सोसायटीच्या लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूल वार्षिक महोत्सवास आमदार नितेशजी राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष महेश सावंत, संचालक संजय आंग्रे, संचालक राजन चिके, संचालक मामा हळदीवे, माजी पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, माजी पंचायत समिती सभापती सौ. सुजाता हळदीवे व इतर संस्था पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांचा गौरव व पुरस्कार प्रदान करून आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूलच्या वतीने आमदार नितेश राणे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक शिक्षणप्रेमी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
ADVT –




