Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

आमदार निलेश राणेंच्या पत्राचा इफेक्ट.!, अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याची पोलीस यंत्रणेने उचलली पावले! ; सर्वधर्मीयांची घेतली बैठक, कायद्याचे उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल करणार! – पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम.

कुडाळ : शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांनी अनधिकृत भोंग्यांसंदर्भात दिलेल्या पत्रानुसार कुडाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी कुडाळ पोलीस ठाणे येथे सर्वधर्मीयांची बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन झाले नाही तर अनधिकृत भोंगे लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल असे या बैठकीत सांगून कोणत्याही प्रकारे ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्या अन्यथा कायद्यानुसार कारवाई करावी लागेल असेही त्यांनी सांगितले.

आमदार निलेश राणे यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना अनधिकृत धार्मिक भोंग्यांसंदर्भात कारवाईची मागणी केली होती. ही मागणी केल्याच्या २४ तासाच्या आत पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी कुडाळ पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील सर्व धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली.

यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले की, ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेनुसार राज्य शासनाने २०१७ मध्ये आदेश निर्गमित केले होते. या आदेशानुसार कोणत्याही समारंभामध्ये किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये स्पीकर, डीजे, ढोल पथक असेल तर त्याची परवानगी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्येसुद्धा मंदिर, मज्जिदवर किंवा अन्य ठिकाणी स्पीकर लावायचे असेल तर परवानगी घेणे गरजेचे आहे. यापुढे अशा परवानगी घेतल्या गेल्या नाही आणि शासनाने ठरवलेल्या आवाजाच्या मर्यादेबाहेर स्पीकर आवाज असेल तर गुन्हा दाखल केला जाईल. त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा दाखल होईल असे त्यांनी सांगितले. तसेच कायमस्वरूपी ज्यांचे स्पीकर मंदिर, मस्जिदीवर आहेत. त्यांनी दर तीन महिन्यांनी परवानगी घेऊन नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. नियमाचे उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल केला जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी कुडाळ पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील सर्व धर्मीय उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles