सावंतवाडी : स्व. प्रा. उदय खानोलकर यांच्या जयंती निमित्त मळगांव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगांव आयोजित मा. श्री. दत्ताराम जी. सडेकर पुरस्कृत शालेय विद्यार्थी निबंध लेखन स्पर्धा कार्यक्रम संपन्न झाला.
व्यासपीठावर ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री. महेश खानोलकर, उपाध्यक्ष श्री. महेश पंतवालावलकर, प्रमुख अतिथी श्री. दत्ताराम जी. सडेकर व सौ. सुहासिनी द. सडेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते स्व. उदय खानोलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करून करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, प्रायोजक मा. श्री दत्ताराम जी. सडेकर यांनी मुलांनी आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी तसेच शरीर निरोगी राहाण्यासाठी आवर्जून प्राणायम करावा. आपल्या गुरुजनांप्रती आदर ठेवावा त्यांचा सन्मान राखावा. हे केल्याने आपण आदर्श नागरिक बनाल व देशाचा विकास कराल असे प्रतिपादन केले. यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री. महेश खानोलकर यांनी मुलांनी संविधानाचा आदर करावा. त्याचा योग्य प्रकारे वापर करून आपले जीवन व भविष्य समृध्द बनवावे. तसेच ग्रंथालयाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा मध्ये सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी कराव्यात असे आवाहन केले.
श्री. दत्ताराम जी. सडेकर यांनी पुरस्कृत केलेल्या शालेय विद्यार्थी निबंध लेखन स्पर्धेसाठी आपले सुपुत्र डॉ. समीर सडेकर यांनी दिलेला रु.१०,०००/- रक्कमचा धनादेश ग्रंथालयाचे अध्यक्ष मा. श्री. महेश खानोलकर यांच्याकडे ग्रंथालयाचे ज्येष्ठ संचालक श्री. बाळकृष्ण मुळीक (सर) यांच्या उपस्थितीत सुपूर्त केला.
कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, नागरिक, तसेच ग्रंथालयाचे पदाधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रंथालयाचे कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर यांनी केले. पृथ्वीराज बांदेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.


