सावंतवाडी : कमी वयात हमखास नोकरी आणि स्वयंरोजगार निर्मिती करायची असेल तर तंत्रशिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून जर योग्य तंत्रशिक्षण घेतले तर आपली आर्थिक परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही, असे मत करियर मार्गदर्शक प्रा. मिलिंद देसाई यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, मडुरा येथे ‘करिअरच्या वाटा व संधी’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष भिकाजी शंकर धुरी, मुख्याध्यापिका सायली परब तसेच १९८४ – ८५ बॅचचे विद्यार्थी तुलसीदास असवेकर, उदय रेडकर, शालेय समिती सदस्य जगन्नाथ धुरी, श्रीकृष्ण भोगले, ज्योती राणे, तसेच करिअर मार्गदर्शक प्रा. रूपेश पाटील, प्रा. मिलिंद देसाई, यशवंतराव भोसले नॉलेज सिटीचे संगणक विभागाचे विभाग प्रमुख प्रा. प्रशांत काटे आदी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका सायली परब तसेच तुलसीदास असवेकर, उदय रेडकर व जगन्नाथ धुरी यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान, प्रा. मिलिंद देसाई यांनी दहावी बारावीनंतरचे करिअर कसे करावे?, तसेच उच्च शिक्षणासाठी कोणत्या कोर्सेसला अधिक मागणी आहे आणि सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी येथे सुरू असलेल्या विविध तंत्र शिक्षणाच्या सोयी व त्यातून कोकणातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसनही त्यांनी केले. या कार्यशाळेला मोठ्या प्रमाणावर पालक वर्ग उपस्थित होता.
ज्ञानदीप मित्र मंडळ व १९८४-८५ एसएससी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सायली परब व तुलसीदास असवेकर यांनी, केले तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक सुरेश सावंत यांनी केले.
दरम्यान कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक एस. के. वराडकर, एस. डी. कांबळे, आर. पी. सावंतभोसले, व्ही. बी. चव्हाण, महेश नाईक, ए. एन. कुरणे, सौ. मृणाल तोरस्कर, सौ. रेश्मा सावंत, सौ. प्रतिभा सावंत तसेच शिक्षकेतर कर्मचारी नाना सावंत, प्रशांत गोसावी, एकनाथ राऊळ, राजू कांबळे व अनिल परब आदी उपस्थित होते.
दरम्यान एसएससी बॅचचे माजी विद्यार्थी तुलसीदास असवेकर, उदय रेडकर, शालेय समिती सदस्य जगन्नाथ धुरी, श्रीकृष्ण भोगले, संतोष गावडे, रामदास परब, भाऊ वराडकर, उदय रेडकर, ज्ञानेश परब, लक्ष्मण गावडे, तानाजी गावडे, प्रकाश पंडित, विलास भाईप, बाबली परब, कल्पना पवार, ज्योती राणे, अनिता पंडित, सजनी परब, येसूबाई नाईक, रत्नप्रभा भाईप, जनाबाई सावळ, शशिकला पंडित, शालिनी परब, श्रीधर जाधव, रामचंद्र सावंत, विष्णू आसवेकर, शशिकांत परब, अंकिता वराडकर, छाया परब, ललिता नाईक, शिवराम पंडित या माजी विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार उदय रेडकर यांनी मानले.


