Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

अभिमानास्पद.! – प्रा. डॉ. ज्ञानेश्वर भामरे राष्ट्रीय क्रांतीसूर्य ‘म. फुले आदर्श प्राध्यापक  पुरस्काराने’ सन्मानित.! 

धुळे : तालुक्यातील गंगामाई एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नगांव ता. जि. धुळे येथील समाजशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. ज्ञानेश्वर काशिनाथ भामरे यांना नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरमतर्फे राष्ट्रीय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श प्राध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लिखाण केलेले आहे. त्यांनी भीमज्योती संघटना, संथागार मैत्री संघ, संथागार प्रतिष्ठान यांच्यामार्फत विविध भागात अतुलनीय अशी कामगिरी केलेली आहे. या कामगिरीमुळे त्यांना आधीही संथागार मैत्री संघ सन्मानपत्र, संथागार राष्ट्रीय पुरस्कार, भीमज्योती बहुउद्देशीय संस्था सन्मानपत्र, आविष्कार फाऊंडेशन सोलापुर इत्यादींतर्फे सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी आतापर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये 32 संशोधन पेपर व दोन पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विद्यार्थी संशोधनाचे कार्य करीत आहेत. अशा विविध क्षेत्रांमध्ये डॉ.ज्ञानेश्वर भामरे यांनी काम केल्यामुळे या नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषदेत फोरमने दखल घेऊन त्यांना आदर्श प्राध्यापक राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. त्यांना मिळालेला आदर्श प्राध्यापक राष्ट्रीय पुरस्काराबद्दल धुळे ग्रामीणचे लोकप्रिय आमदार मा. राघवेंद्रजी (रामदादा) भदाणे, संस्थेचे अध्यक्ष मा. बाळासाहेब मनोहरजी भदाणे, मा.माईसोा. ज्ञानज्योती मनोहर भदाणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू – भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी बंधू – भगिनी यांनी त्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles