गुळदुवे ग्रामस्थांना सलाम! ; गावातील नदी पात्रातील सफाईचे काम श्रमदानातून लावले मार्गी.

सावंतवाडी : तालुक्यातील गुळदुवे येथील नदीचे पाणी झाडी नदी पात्रात वाढल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा विसर्ग योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पूरसदृश्य परिस्थितीला सामोरे जावे लागते. शेतीत पाणी घुसते व मोठी आपत्ती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. शासन स्तरावर याची उपाय योजना व्हावी, अशी विनंती करुनही अजून काही ठोस झाले नाही. अखेर गावातील नदी पात्रातील सफाईचे काम गुळदुवे ग्रामस्थांनीच श्रमदानातून मार्गी लावले.

या श्रमदानात रुपेश धर्णे, रवींद्र धर्णे, नंदू धर्णे, प्रशांत खोबरेकर, कमलकांत कोल्हे, दिलीप मामलेकर, मुकुंद धर्णे, अरुण धर्णे, रघुनाथ धर्णे, रमाकांत शेटकर, संतोष सावंत आदी ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles