Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा उत्साहात.!

वैभववाडी : समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयावर आधारित चाळीस वर्षांपासुन कार्यरत असलेल्या दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन उपक्रमाचे दासबोध सखोल अभ्यास संकेतस्थळाचा लोकार्पण सोहळा समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांचे कार्यवाह आदरणीय श्री.योगेश बुवा पुरोहित यांच्या हस्ते दि. २५ डिसेंबर रोजी आँनलाईन पद्धतीने संपन्न झाला.
दासबोध सखोल अभ्यास संकेतस्थळामुळे रामदास स्वामींचे समग्र, अफाट, अमोघ आणि कालातीत असलेले अक्षर वाङ्ममय जगामध्ये प्रत्येक कोपऱ्यात समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करणारे अभ्यासार्थी , संशोधक आणि समर्थ भक्त यांना बोटाच्या क्लिकवर उपलब्ध होईल असे उद्गार श्री.योगेश बुवा यांनी याप्रसंगी काढले.

मुख्य पृष्ठ


दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन या उपक्रमाची सुरुवात परमपूजनीय अक्का स्वामी वेलणकर (अंबरनाथ ) यांनी १९८४ या वर्षी केली. आज चाळीस वर्षानंतर या उपक्रमाचे अभ्यासार्थी जगातल्या सहा देशांमध्ये आणि देशातल्या अकरा राज्यांमध्ये वाङ्मयाचा सखोल अभ्यास करत आहेत ही गौरवाची बाब होय असे मत एम. श्रीनिवासन यांनी व्यक्त केले आणि चेन्नईहून या उपक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन या उपक्रमाचे संचालक डॉ. विजय लाड यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी पूजनीय अक्का स्वामी वेलणकर आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री. केदार परांजपे यांनी शंखध्वनी केला. सौ शुभदा थिटे यांनी त्रयोदशाक्षरी मंत्राची एक माळ घेतली. सौ.अपर्णा वांगीकर यांनी तीन श्लोकांचे पठण केले. संकेत स्थळाची माहिती आणि प्रात्यक्षिक आनंद जोगळेकर व सौ. मुग्धा महाबळेश्वरकर यांनी दिली. ऑनलाइन पद्धतीने हा संकेत स्थळ लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना डाॅ. भावार्थ देखणे (पुणे), एम. श्रीनिवासन (चेन्नई), बी. रामचंद्रन गोस्वामी (तंजावूर), शरदजी कुबेर (सातारा), दुर्गाप्रसाद स्वामी (पुणे), दिवाकर देशपांडे (महाबळेश्वर), बाबासाहेब तराणेकर (इंदुर) , विवेक रामदासी (अंबरनाथ), दामोदर रामदासी (नवगण राजुरी), राकेशबुवा रामदासी (एक्केहाळी), राघवेंद्र महाराज (ग्वाल्हेर), मधु नेने (वाई), प्रा. दादासाहेब जाधव (धाराशिव), अजेय बुवा रामदासी (पुणे), दत्तात्रय रत्नाळीकर (अकोला) अशा अनेक महानुभावांनी दासबोध सखोल अभ्यास या संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्याची प्रशंसा केली आणि शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. रंजना पाटील यांनी आभार प्रकटीकरण केले तर सौ. मेधा कुलकर्णी यांनी कल्याणकरी रामराया ही प्रार्थना म्हटली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वृंदा जोगळेकर यांनी केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles