Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

दोडामार्ग तालुक्यातील हत्तींच्या कळपांचा बंदोबस्त न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार.! ; जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांचा इशारा.

सावंतवाडी : दोडामार्ग तालुका येथे गेले दोन वर्षे हून अधिक हत्तींच्या कळपाने फळ बागायतकरांचे अतोनात नुकसान करून त्याचप्रमाणे भर वस्तीमध्ये हत्तींच्या कळपांची दहशत सुरू झालेले आहे. यासाठी सर्व पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी राजकारण न करता एकत्र येऊन मुख्यमंत्री व वनमंत्री यांना निवेदन देऊन हत्तीच्या कळपाला पकडून राखीव जंगलामध्ये प्राणीसंग्रहालयामध्ये हत्तींचा कळप पकडून तिथे तो सोडावा.

जेणेकरून दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांना आज जे जीव मुठीत करून घराच्या बाहेर पडावे लागते तसेच बागायतदारांचे हाता- तोंडाला आलेले उत्पन्न हत्तींच्या कळपामुळे अतोनात नुकसान होते. त्याचप्रमाणे आपल्या फळबागांमध्ये जात असताना महिला किंवा पुरुष असे व्यक्ती जात असतात. त्यांच्या जीवास धोका होऊ नये म्हणून 15 दिवसाच्या आत अंमलबजावणी करून दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांना दिलासा द्यावा.

असे न केल्यास मी स्वतः जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी हे शासनाच्या विरोधात लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. कुठलाही व्यक्ती दोडामार्ग तालुक्यातील मृत्यूमुखी पडल्यास त्याला जबाबदार शासन असेल. त्याचप्रमाणे वनविभागाचे अधिकारी वरिष्ठ हे असेल. त्यांना जबाबदार का धरु नये ?

अशा प्रकारची पहिली 80 सेक्शन खाली मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाण्याची नोटीस पंधरा दिवसाची देणार आहोत. तरी हत्तींचा बंदोबस्त न झाल्यास त्यांना प्राणीसंग्रहालयामध्ये बंदोस्त करून न सोडल्यास व दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याला मुख्यमंत्री वनमंत्री मंत्री तसेच मुख्य सचिव वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी हे जबाबदार राहणार आणि त्यांच्यावरती कारवाई का होऊ नये अशा प्रकारची याचिका उच्च न्यायालयात जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष सावंतवाडी राजेंद्र प्रभाकर मसूरकर हे दाखल करणार आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles