देवगड : तालुक्यातील तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, तळेबाजार संचलित, महात्मा गांधी विद्यामंदिर, तळेबाजार या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उद्या शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता संस्थेचे अध्यक्ष संदीपशेठ तेली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून डॉ. उमेश शंकरराव पाटील तसेच सुप्रसिद्ध व्याख्याते व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच विशेष अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सचिव कृष्णा साटम, खजिनदार संतोष वरेरकर, सदस्य बाळकृष्ण पारकर, विश्वास सावंत, संजय जाधव तसेच तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, तळेबाजार यांचे सर्व सहकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमास शिक्षणप्रेमी, पालक वर्ग व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रभारी मुख्याध्यापक राजेश वाळके, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुशील जोईल, विद्यार्थी प्रतिनिधी पियुष अनभवणे, विद्यार्थिनी प्रतिनिधी पूर्वा राणे यांनी केले आहे.
ADVT –



