सावंतवाडी : पोलीस रायझिंग सप्ताहानिमित्त सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पी.एस.आय. मुळीक मॅडम यांनी कलंबिस्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना पोलीसांच्या विविध शस्त्रांविषयी प्रात्यक्षिकासहीत माहिती दिली. त्याचप्रमाणे मोबाईल, इंटरनेट व सोशल मिडिया यांच्या वापराबाबत कोणती दक्षता घ्यावी, सायबर सुरक्षा इ.विषयी मार्गदर्शन केले.आपले उत्तम करीअर घडविण्यासाठी विद्यार्थी जीवनात अभ्यास,खेळ व प्रामाणिक मेहनत या गोष्टींना महत्व द्या असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर पोलीस हवालदार परब, कलंबिस्त पोलीस पाटील प्रियांका सावंत, मुख्याध्यापक अभिजीत जाधव, धनराज सजगुरे, रविकमल सावंत आदी उपस्थित होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी उपस्थित पी.एस्.आय.मुळीक मॅडम व कलंबिस्त पोलीस पाटील प्रियांका सावंत यांचा प्रशालेच्या वतीने सहाय्यक शिक्षिका विनिता कविटकर मॅडम यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन किशोर वालावलकर यांनी केले.
ADVT
–



