दोडामार्ग : दोडामार्ग इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दोडामार्ग मध्ये गेली 30 वर्षे शिक्षकेतर कर्मचारी म्हणून सेवाभावीवृत्तीने सेवेत कार्यरत असलेले श्री.आनंद राघोबा म्हावळणकर यांना नुकताच शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी या संस्थेचा आदर्श शिक्षकेतर गुणवान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण प्रसारक मंडळ,सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज,सावंतवाडीच्या वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळ्याचे औचित्य साधून पुरस्कार व सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत, सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, संस्थेचे सचिव व्ही. बी.नाईक, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, खजिनदार सी. एल. नाईक, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण वेळी श्री. म्हावळणकर यांची आई श्रीमती सावित्री राघोबा म्हावळणकर, पत्नी सौ. अनघा आनंद म्हावळणकर व मुलगा राघोबा आनंद म्हावळणकर, बहिण सौ. रसिका जनार्दन मांजरेकर, सौ. वर्धा लवू गुळेलकर तसेच मुख्याध्यापक प्रल्हाद सावंत व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या पुरस्कारामुळे दोडामार्ग हायस्कूलमध्ये नुकतेच श्री.आनंद म्हावळणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ नाईक व माजी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल गवस, शिक्षक रमाकांत जाधव, सौ. प्रतिक्षा नाईक, श्री. उराडे सर, तुळशीदास राऊळ सर, सौ.आराध्या प्रभू, सौ. स्नेहल गवस, सौ.चैताली सावंत, सौ. दिप्ती गवस आदि उपस्थित होते.