Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

पंत संतापले अन् कागारूंना धुतले, टीम इंडियाकडे १४५ धावांची आघाडी! ; सामना रंगतदार स्थितीत.

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. सामन्यात दुसऱ्या दिवशी एकूण 15 विकेट्स पडल्या. तसेच 313 धावा झाल्या. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी 172 धावांच्या मोबदल्यात 9 विकेट्स गमावल्या. तर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 4 धावांच्या नाममात्र आघाडीसह 141 रन्स करत 6 विकेट्स गमावल्या. टीम इंडिया या सामन्यात 145 धावांनी आघाडीवर आहे. त्यामुळे तिसर्‍या दिवशी क्रिकेट चाहत्यांना आणखी रंगत पाहायला मिळू शकते.

दिवसभराचा खेळ –

ऑस्ट्रेलियाने 9-1 धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंना 181 धावांवर गुंडाळलं आणि 4 रन्सची लीड मिळवली. ऑस्ट्रेलियासाठी डेब्यूटंट ब्यू वेबस्टर याने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर स्टीव्हन स्मिथ 33, सॅम कोनस्टास 23, एलेक्स कॅरी 21 आणि कॅप्टन पॅट कमिन्स याने 10 धावांचं योगदान दिलं. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या दोघांनी सर्वाधिक आणि प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर नितीश रेड्डी आणि कॅप्टन जसप्रीत बुमराह या दोघांनी प्रत्येकी 2-2 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

भारताचा दुसरा डाव –

त्यानंतर टीम इंडियाने 4 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाला सुरुवात केली. टीम इंडियाने खेळ संपेपर्यंत 32 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 141 धावा केल्या. टीम इंडियाने अशाप्रकारे 145 धावांची आघाडी घेतली आहे. भारतासाठी दुसऱ्या डावात ऋषभ पंत याने तोडू अर्धशतकी खेळी केली. पंतने 33 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 6 फोरसह सर्वाधिक 61 धावांचा खेळी केली.

यशस्वी जयस्वालने 22 धावा केल्या. केएल राहुल आणि शुबमन गिल या दोघांनी प्रत्येकी 13-13 धावा जोडल्या. विराट कोहली याने 6 तर नितीश कुमार रेड्डीने 4 धावा केल्या. तर रवींद्र जडेजा 8 आणि वॉशिंग्टन सुंदर 6 धावांवर नाबाद परतले आहेत. ऑस्ट्रेलियासाठी स्कॉट बोलँड याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि ब्यू वेबस्टर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतलीय.

ADVT – 

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles