मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या तीन-चार वर्षांपासून टोकाच्या आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण गढूळ झाले होते. परंतु आता राज्यातील राजकारण बदलण्याचे संकेत मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक सामनातून झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीही फडणवीस यांचे कौतूक केले. शिवसेना उबाठाच्या या कौतूक सोहळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही फडणवीस यांच्या कामांची स्तुती केली आहे. महाराष्ट्रातील बदललेले राजकारण भविष्यात कोणत्या दिशेने जाणार त्याचे संकेत मिळत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सामना मुखपत्रात देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला गडचिरोली दौरा केला. नक्षलप्रभावग्रस्त या भागात फडणवीस यांनी दौरा करुन एक आदर्श निर्माण केल्याचे सामनामध्ये म्हटले. त्याच्या एका दिवशापूर्वी सामनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डिप्रेशनमध्ये असल्याचे म्हटले होते. म्हणजे शिवसेना उबाठाकडून फक्त फडणवीस यांचे कौतूक करण्यामागे काय कारण आहे? त्याची चर्चा होत आहे.
कौतुकावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
सामनातून कौतूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक केले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनीही कौतूक केले. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमचा पक्ष नेहमी सत्य मांडत असते. फडणवीस यांचा गडचिरोली दौरा राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील मधुर संगीताचे हे राजकारण आहे. आमची टीका रचनात्मक असते. परंतु जेव्हा चांगले काम होते, त्याचे कौतूक केले जाते. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी चांगले काम करत असेल तर त्यात फक्त देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेता येईल.
ADVT –