सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महा अभियान २०२५ अंतर्गत सावंतवाडी शहरातील भटवाडी प्रभाग येथील सदस्यता नोंदणीचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नितेश राणे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत सदस्यता नोंदणी अभियाना संदर्भात आढावा घेतला.
भाजपच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात जास्तीत जास्त नोंदणी करण्यासंदर्भात यावेळी त्यांनी सूचना केल्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, भाजपा शहर मंडल महिला अध्यक्ष मोहीनी मडगांवकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर, प्रभाग अध्यक्ष कुणाल श्रुंगारे, विजय सावंत, संतोष खंदारे, गौरव रामाणे, ललीत नाईक, संदेश मोर्ये,नितीन सातपुते, सालईवाडा बुथ अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटकर, सुनील जाधव, शबाब शेख, मेघना साळगांवकर, मेघना भोगटे, अन्वीशा मेस्त्री आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


