सावंतवाडी : येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय खो-खो क्रीडास्पर्धेत कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने अंतिम सामना जिंकत घवघवीत यश संपादन केले व त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक प्रकाश पावरा यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष शिवाजी सावंत, सचिव यशवंत राऊळ, चंद्रकांत राणे व सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्गाने अभिनंदन केले आहे.
तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात कलंबिस्त हायस्कूलची बाजी.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


