सावंतवाडी : महायुतीत सद्या ज्या ठिकाणी जे आमदार आहेत, त्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे घोषित झालेले आहे. अद्याप महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. कार्यकर्त्यांना नाराज करता येत नाही. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. लवकरच उमेदवारांच्या याद्या जाहीर होतील, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी आज दिली. मुंबई मंत्रालय येथून त्यांनी दुरुस्त प्रणालीद्वारे आज पत्रकारांशी संवाद साधला.
दरम्यान मंत्री केसरकर पुढे म्हणाले, मागीलवर्षीप्रमाणे यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ध्वजारोहण माझ्याहस्ते होणार आहे.


