Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

आपत्कालीन परिस्थितीसाठी सावंतवाडीत रुग्णवाहिका येणार, सामाजिक बांधिलकीच्या शिलेदारांचा निर्धार! ; दानशूरांनी मदतीसाठी पुढे यावे.! : उद्योजक शैलेश पै यांचे आवाहन.

सावंतवाडी : आपत्कालीन परिस्थितीत सावंतवाडीत रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने लोकवर्गणीतून शहरासाठी ‘अद्ययावत रूग्णवाहिका’ आणण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योजक शैलेश पै यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासाठी निधी संकलन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. रूग्णांना तात्काळ सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मोफत सेवा देणारी जीवनदायीनी खरेदी करण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला. शहराबाहेर जाण्यासाठीही सामाजिक हित जपत केवळ माफक दरात ही रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे‌. रूग्णवाहिकेअभावी होणारी परवड लक्षात घेऊन सामाजिक हित अन् रूग्णसेवेच्या भावनेतून ही संकल्पना पुढे आली आहे.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमांतर्गत रूपये १० लाख एवढी किंमत असलेली अद्ययावत रुग्णवाहिका खरेदी करण्याचे ठरविण्यात आले. यासाठी लोकवर्गणी जमा केली जाणार असून निधी संकलन करण्यासंदर्भातील चर्चा आजच्या बैठकीत घेण्यात आली. तसेच देखबाल दुरूस्तीसाठीचा विषय चर्चेला आला असता त्याची जबाबदारी उपस्थित सदस्यांनी घेतली. यावेळी रुग्णवाहिका आणण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम उभी करण्यासाठी समाजातील दानशूरांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन उद्योजक शैलैश पै यांनी केले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहीका उपलब्ध होत नाही ही वस्तूस्थिती आहे. समाजातील दानशुर लोकांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पाठीशी रहावे आणि आपले योगदान द्यावे असे आवाहन श्री‌.‌पै यांनी केले‌. यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा‌. सतिश बागवे, खजिनदार रवी जाधव, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, प्रा.शैलेश नाईक, समिरा खलील, रुपा मुद्राळे, अशोक पेडणेकर, शाम हळदणकर, हेलन निब्रे, प्रा. रूपेश पाटील, पत्रकार अमोल टेंबकर, भुवन नाईक, समिक्षा सावंत, मृणाल पावसकर, साहिल सावंत, अवधुत सावंत, राज राऊळ, चेतन जाधव, विनायक गांवस,, अँड. अनिल निरवडेकर, निखील माळकर आदी उपस्थित होते.

सावंतवाडी शहरात आपत्कालीन परिस्थितीत मोफत आणि तात्काळ सेवा देता यावी यासाठी ही रुग्णवाहिका काम करणार आहे. शहरात या माध्यमातून मोफत सेवा देण्यात येणार आहे. तर शहराबाहेर किंवा अन्य ठिकाणी सेवा देण्यासाठी ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर सेवा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. रुग्णवाहिका खरेदीसाठी आणि अन्य वैद्यकीय यंत्रणेसाठी तब्बल १० लाख खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी लोकवर्गणीतून निधी संकलन करण्याचा निर्णय घेतला. तसेच समाजातील सर्व दात्यांनी पुढाकार घेवून सामाजिक कार्यासाठी व रूग्णसेवेसाठी हातभार लावावा असे आवाहन यावेळी करण्यात आलं. मदतीसाठी दात्यांनी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव 9405264027 आणि प्रा. शैलेश नाईक 9422379567 यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles