Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

प्रेरणादायी – गरीबी शिक्षणाच्या आड येत नाही.! ; विद्यामंदिरच्या ‘ह्या’ लेकीची धडपड वाखाणण्याजोगी.!

कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत इयत्ता सातवी शिकणारी विद्यार्थीनी कुमारी जागृती राणे ही एक गुणी आणि हुशार विद्यार्थीनी आहे हिचे मुळगाव श्रावण घरच्या गरिबीमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी ह्यांचे कुटुंब कणकवली शहरात आले आणि एका श्रीमंत घरची व्यवस्था व घरकाम करण्याचे काम कुटुंबाला मिळाले . जागृतीच्या कुटुंबात फक्त आईच कष्टकरून लहान मुलांना वाढवित आहे आणि पोटाला चिमटे काढून दोन मुलांचे शिक्षण पूर्ण करीत आहे आईचे कष्टातील हाल पाहून बालमन विचलित न होता मिळेल त्या परिस्थितीत कुमारी जागृती आईला मदत करीत आपला अभ्यास पूर्ण करते ज्या घरात ती राहाते त्या अंगणातील फुले गवती चहा आणि भाजीची फळं घर मालकांची परवानगी काढून त्यांच्या मदतीने घराच्या बाहेर शाळा सुटल्यावर सकाळ सायंकाळ रस्त्याच्या कडेला बसून विकत बसते जागृतीचा गोंडस स्वभाव निर्भिड वृत्ती कोणताही संकोच न करता न लाजता छोट्या वस्तू विकत फुलांच्या माळा विणत ती आनंदाने विक्री करते खरचं जागृतीच्या जिद्दीची कमाल वाटते शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री उमेश वाळके साहेब यांना या गरीब मुलींच्या जिद्दीचा अभिमान वाटला आणि शाळेला याची कल्पना दिली प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी प्रत्यक्ष वर्गात जावून जागृतीची विचारपूस केली आणि तिच्या जिद्दीचे कौतुक केले पत्रकार चिंदरकर साहेब देसाई साहेब यांनी प्रशालेत भेट देवून जागृतीचे कौतुक केले आणि विविध क्षेत्रातून मदत कशी मिळेल या विषयी आश्वासन दिले पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव मॅडम, अच्युतराव वणवे सर यांनीही जागृती राणे हिचे कौतुक करून तिला शिक्षणासाठी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles