संजय पिळणकर.
बांदा : महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिन व सप्ताहाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात विविध उपक्रम राबविण्यात आले.त्याचाच एक भाग म्हणून बांदा पोलीस स्टेशनच्या वतीने बांदा येथील विठ्ठल मंदिरात रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी रक्तदान शिबिरात ४० हून अधिक रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग घेतला.सर्व रक्तदात्यांना सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच या शिबिरात १५० हून अधिक जणांची आरोग्य चिकित्सा करण्यात आली.
या आरोग्य शिबिराचे उद्वाटन सामाजिक कार्यकर्तें व सी ए
साईप्रसाद कल्याणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी बांदा पोलीस निरीक्षक विकास बड़वे,राज्य उत्पादन शुल्क खात्याचे दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान,सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर,रोटरी क्लबचे अध्यक्ष सीताराम गावडे,एसएसपीएम मेडिकल कॉलेज व रुग्णालय पड़वेचे मनीष यादव,माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर आदी उपस्थित होते.
यावेळी शिबिरात उपस्थित नागरिकांची आरोग्य चिकित्सा करून त्यांना मोफत औषधे वाटप करण्यात आली.एसएसपीएम मेडिकल कॉलेज व रुग्णालय पड़वे यांच्या वैद्यकीय पथकाने आरोग्य चिकित्सा केली.
यावेळी शिबिराला अप्पर पोलीस अधीक्षक हृषीकेश रावले, तहसीलदार श्रीधर पाटील, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर,सरपंचा प्रियांका नाईक, उपसरपंच बाळू सावंत,माजी उपसरपंच जावेद खतीब,व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष शेखर बांदेकर,ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव गुरुनाथ नार्वेकर,सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठांचे,निलेश मोरजकर,अक्षय मयेकर यांच्यासह पोलीस ठाणे अंतर्गत सर्व गावांचे पोलीस पाटील,होमगार्ड,पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील नितीन नाईक यांनी केले. आभार पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी मानले.