सावंतवाडी: एस आर दळवी फाऊंउंडेशन आणि विलवडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १२ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजता विलवडे शाळा नं १ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात विलवडे पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदानासारख्या महान कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन विलवडे सरपंच प्रकाश दळवी आणि एस आर दळवी फॉउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी प्रकाश दळवी 9404395878 आणि परेश धर्णे 7498644782 यांच्याशी संपर्क साधावा.