मुंबई : अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक 17 आणि रविवार दिनाक 18 जानेवारी रोजी मुंबईत पहिले अखिल भारतीय भजन संमेलनाचे आयोजन दादर माटुंगा कल्चरल सेंटर (DMCC), यशवंत नाट्यगृह शेजारी, माटुंगा (प.), मुंबई इथे करण्यात आले असून या पहिल्या भजन संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिषजी शेलार हे करणार असून या भजन संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध भजनकार आणि अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ अध्यक्ष श्री. बुवा भगवान लोकरे तर संमेलनाध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हे आहेत.
शनिवार दि. १८ जानेवारी २०१५ रोजी सकाळी ठीक ८.०० वाजता भजन दिंडीसह शोभायात्रेने प्रारंभ होईल स्वर्गीय कोकण कला भूषण भजन सम्राट चंद्रकांत कदम बुवा यांच्या निवास स्थानापासून स्वर्गीय भजन रत्न भजनकार विलास पाटील बुवा व स्व. संगीतकार भजनकार बुवा स्नेहल भाटकर यांचे निवासस्थाना पासुन संमेलन स्थळापर्यंत ही भजन दिंडी शोभायात्रा आयोजित केली असून सकाळी ९.३० वाजता उद्घाटन समारंभ आणि प्रकाशन सोहळा सपन्न होईल या प्रकाशन सोहळ्यात लोककला अभ्यासक प्राध्यापक वैभव खानोलकर, सिंधुदुर्ग यांचे दशावतार लोककलेचे सर्वांगीण शोध घेणारे संशोधनात्मक पुस्तक एक समृद्ध लोककला – दशावतार या पुस्तकाच्या मुखपृष्ठ प्रकाशन करण्यात येणार असून या कार्यक्रमात ज्येष्ठ मालवणी कवी श्री. दादा मडकईकर आणि नाटयनिर्माता श्री . प्रसाद मच्छिंद्र कांबळी (माजी अध्यक्ष -अखिल भारतीय मराठी नाटय परिषद )हे सुद्धा सहभागी होणार आहेत. या नंतर सकाळी ११.०० वाजता भजन स्पर्धेला सुरवात होईल .
त्या नंतर दुपारी ०२.०० वाजता अखिल भारतीय भजन संस्कृती या विषयावरील परिसंवाद होईल या परिसंवादात श्री. वल्लभभाई सावलीया (भजन अभ्यासक कीर्तनकार, गुजरात) श्री. अनंतम लोकनाथ (भजन अभ्यासक केरळ राज्य – आणि कीर्तनकार व भजन समीक्षक तामिळनाडू राज्य) श्री. प्रशांत धोंड (प्राचार्य, भजन अभ्यासक कीर्तनकार, महाराष्ट्र) श्री. लोकेश चतुर्वेदी (भजन अभ्यासक, मथुरा उत्तरप्रदेश) हे दिग्गज मान्यवर सहाभागी होणार असून या परिसंवादाचे निवेदन वृत्तनिवेदिका पुढारी न्युज चॅनेलच्या रिद्धी म्हात्रे करणार आहेत
त्या नंतर दुपारी ४.०० वाजता रेल्वे भजन या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करत रेल्वेत सादर होणाऱ्या भजनावर चर्चा केली जाणार असून या मध्ये गायक श्री. अविनाश आंब्रे आणि गायिका कु. सानिका कनसे सहभागी होणार असून याचे निवेदन झी २४ तासच्या पत्रकार मनुश्री पाठक या करणार आहेत या दिवशी संध्याकाळी ६.०० वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून ध्वनी योजना आणि ध्वनी संयोजन या विषयावर चर्चा होणार असून या चर्चेत ज्येष्ठ ध्वनी संजोयक श्री. अनंत बाईत आणि श्री. श्रीकृष्ण सावंत सहभागी होणार असून याचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हाचे लोककला अभ्यासक प्रा. वैभव खानोलकर करणार आहेत. संध्याकाळी ७.०० वाजता साईदामोदर भजनी मंडळ मडगांव गोवा शुभम नाईक याची भजन संध्या हा कार्यक्रम होऊन पहिल्या दिवसाची सागता होईल.
दुसर्या दिवशी रविवार, १९ जानेवारी रोजी सकाळी ठीक ८.०० वा. पासून भजन स्पर्धेला सुरवात होईल या नंतर दुपारी २.०० वाजता भजनाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून यात बुवा श्री. निवृत्ती चौधरी (ज्येष्ठ भजनकार) व बुवा श्री. गोपीनाथ बागवे (ज्येष्ठ भजनकार) बुवा श्री. भालचंद्र केळूसकर (सिंधुरत्न भजनकार). बुवा श्री. महादेव शाहबाजकर (ज्येष्ठ भजनकार) बुवा श्री. प्रकाश चिले (गायक / परिक्षक) श्री. ज्ञानेश्वर (माऊली) सावंत (ज्येष्ठ मृदुंगमणी) श्री. बाळू थोरवे (ज्येष्ठ तबला वादक) श्री. प्रताप पाटिल (पखवाज वादक) श्री. संतोष शिर्सेकर (सुप्रसिद्ध भजनकार) .श्री. प्रशांत धोंड (भजन समीक्षक / प्राध्यापक / किर्तनकार) श्री. संतोष कासले (आयोजक विजय क्रिडा मंडळ, भांडुप) त्याच बरोबर मानधन समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष बुवा संतोष कानडे हे सहभागी होणार असून याचे निवेदन प्रा.वैभव खानोलकर आणि सुप्रसिद्ध समालोचक राजा सामंत हे करणार आहेत या दिवशी संध्याकाळी ५.०० वाजता भजन स्पर्धेचे निकाल आणि बक्षिस वितरण होणार असून भजन क्षेत्राला वाहून घेतलेल्या भजनी बुवांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून संध्याकाळी ७.०० वाजता सुरमयी भजन संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात सुप्रसिद्ध गायक श्री. अजित गोसावी (संगीत अलंकार) आणि सहकारी गायक श्री. महेश कंठे तसेच आवाज महाराष्ट्राचा महाविजेते लोकप्रिय गायक आणि मंडळी यांचा सहभाग असेल अखिल भारतीय भजन संमेलनाची सांगता पसायदानाने होईल हे पसायदान कु. भैरवी सुनिल जाधव या सादर करतील या सागता सोहळ्याचे अध्यक्षपदी आमदार सुनिल प्रभू असणार असुन इतर मान्यवर मंडळीं या सांगता समारोपाला हजेरी लावणार आहेत.
हितवर्धक मंडळ आयोजित पहिल्या अखिल भारतीय भजन संमेलनात श्री. रविंद्र चव्हाण (आमदार प्रदेशाध्यक्ष भाजप), आ. अनिल परब (विभागप्रमुख आमदार – महाराष्ट्र राज्य) आ.सुनील प्रभू (आमदार – महाराष्ट्र राज्य) श्री. महेश सावंत (आमदार महाराष्ट्र राज्य), श्री. प्रकाश सुर्वे (आमदार – महाराष्ट्र राज्य), श्री. संजय पोतनीस (आमदार महाराष्ट्र राज्य). श्री. संदीप देशपांडे (नेते / प्रवक्ते मनसे), श्री. नितेश राणे (कॅबिनेट मंत्री मत्स्य व्यवसाय बंदरे, महाराष्ट्र राज्य) श्री. संजय पाटील (खासदार, भारत सरकार) श्री. नाना पटोले (आमदार, प्रदेशाध्यक्ष – काँग्रेस) श्री. सुभाष भोईर (आमदार, कल्याण ग्रामीण) श्री. शिरीष सावंत (मनसे), श्री. रमाकांत मढवी (दिवा शहर, मा. उपमहापौर ठाणे) सुनील राऊत (आमदार) अशोक पाटील (आमदार), श्री. कमलेश सुतार (कार्यकारी संपादक – झी २४ तास) श्री. प्रसाद मच्छिंद्र कांबळी (नाट्य निर्माता / मा. अध्यक्ष अखिल भारतीय नाटक, श्री. मिलिंद जोशी (संगीतकार) श्री. विजय गवंडे (संगीतकार) श्री. मंगेश कांगणे (गीतकार) श्री. संजय सावंत (लेखक) श्री. प्रकाश लब्दे (दशावतार कलावंत) श्री. दिगंबर नाईक (अभिनेता) श्री. गुरु ठाकूर (गीतकार) श्रीमती लतिका सावंत (अभिनेत्री) श्री. भीमराव पांचाळे (गझल गायक) आदि सन्मानीय मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.
तरी सर्व भजन प्रेमी तसेच भजनी बुवा आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ अध्यक्ष श्री. बुवा भगवान लोकरे आणि सचिव सुप्रसिद्ध बुवा श्री. प्रमोद हर्याण यानी केले आहे.


