नवी दिल्ली : खो – खो वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने सलग तिसरा विजय मिळवला. नेपाळ, ब्राझीलनंतर पेरू संघाला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिसऱ्या सामन्यात पेरूला टीम इंडियाने चांगलंच झुंजवलं. तिसऱ्या डावात टीम इंडियाकडे मोठी आघाडी होती. त्यामुळे सात मिनिटात इतका मोठा फरक कमी करणं कठीण होतं. त्यामुळे तिसऱ्या डावातच टीम इंडियाच विजय पक्का झाला होता. त्यामुळे प्रत्येक सेकंदाला टीम इंडिया आपला विजय पक्का करत होती. अखेर टीम इंडियाने पेरूला 70-38 च्या फरकाने पराभूत करत आपला विजय पक्का केला. भारताने पहिल्या डावात अटॅक करत सामना आपल्या ताब्यात ठेवला होता. त्यामुळे पेरूला कमबॅक करणं कठीण झालं. भारताचा पुढचा सामना भुतानशी होणार आहे. मात्र हा सामना नाममात्र असणार आहे. कारण भारताने सलग तीन सामने जिंकून आधीच उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. भारताने पहिल्या डावात अटॅक करत 36 गुणांची कमाई केली होती. तर पेरूला एकही डिफेंस गुण दिला नाही. त्यानंतर दुसऱ्या डावात बचावात्मक खेळताना पेरूच्या खेळाडूंना चांगलंच झुंजवलं. खेळाडूंना बाद करण्यासाठी पेरूच्या खेळाडूंना चांगलाच घाम गाळावा लागला. पण इतकी मेहनत करूनही पेरूला फक्त 16 गुण मिळवता आले. त्यामुळे दुसर्या डावाअखेर भारताकडे 20 गुणांची आघाडी होती. तिसऱ्या डावात टीम इंडियाने पुन्हा चांगला अटॅक केला. या डावात टीम इंडियाने 34 गुणांची कमाई केली. त्यामुळे 54 गुण भारताच्या खात्यात होते. शेवटच्या सात मिनिटात हा फरक कमी करणं काही पेरूला जमलं नाही. पेरून शेवटच्या सत्रात 22 गुण मिळवले आणि भारताचा 32 गुणांनी विजय झाला. रामजी कश्यपने या सामन्यात चांगला डिफेंस केला. तर सामनावीराच्या पुरस्काराने अनिकेत पोटेला गौरविण्यात आलं.
ADVT –



